Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाकच्या हिंदूविरोधी नापाक कारवाया

पाकच्या हिंदूविरोधी नापाक कारवाया

=दीडशे वर्षे जुने मंदिर गुपचूप पाडण्याचा डाव, याचिका दाखल=
peshawar-high-courtपेशावर, [८ नोव्हेंबर] – पाकिस्तानच्या पेशावर येथील जुन्या शहरात सध्या पूर्णपणे बंद असलेले सुमारे दीडशे वर्षे जुने हिंदू मंदिर गुपचूप पाडून तिथे कमर्शियल प्लाझा तयार करण्याची नापाक योजना पाकमधील काही उद्योगपतींनी आखली आहे. या योजनेची माहिती मिळताच दोन वकिलांनी पेशावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मंदिराचे रक्षण करण्याची मागणी केली आहे.
या मंदिराचे रक्षण करण्यात यावे आणि पाकच्या पुरातत्व शास्त्र विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणात ते देण्यात यावे, अशी विनंती पाकचेच नागरिक असलेल्या दोन वकिलांनी याचिकेतून केली आहे. मुहिबुर रेहमान आणि वाकिफ सलीम अशी त्यांची नावे आहेत.
हे मंदिर उद्‌ध्वस्त करून त्या जागेवर आलिशान कमर्शिअल प्लाझा तयार करण्याचा काही व्यावसायिकांचा कट दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आली आहे. यानंतर सरकारने ही संपूर्ण संपत्ती सील केली असून, दोघांना अटकही केली आहे. तथापि, ट्रस्ट प्रॉपर्टी विभागातील काही अधिकार्‍यांना हाताशी घेऊन व्यावसायिकांनी मंदिर पाडण्याचे आपले कारस्थान सुरूच ठेवले आहे. देशातील अनेक दैनिकांनीही मंदिराच्या छायाचित्रासह याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. त्यामुळे मंदिराचे तातडीने रक्षण करण्याची गरज असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
या देशात राहणार्‍या अल्पसंख्यकांचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारचीच असल्याने त्यांच्या संपत्तीचे आणि श्रद्धास्थळांचेही रक्षण केले जावे, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google