Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाकमधील काही हिंदू मंदिरांना सीसीटीव्ही सुरक्षा

पाकमधील काही हिंदू मंदिरांना सीसीटीव्ही सुरक्षा

=सिंध प्रशासनाचा निर्णय=
sindh-culture-and-history-of-sindh-pakistanकराची, [२१ ऑक्टोबर] – पाकिस्तानधील सिंध प्रांतातील मंदिर, चर्च व गुरुद्वारांना सीसीटीव्ही सुरक्षा प्रदान करण्यासाठी ४० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
सिंध प्रांतातील ‘अल्पसंख्यक’ समुदायांच्या विविध धर्मस्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यासाठी ही ४० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्‌टो-झरदारी यांनी ‘अल्पसंख्यकांना संपूर्ण सुरक्षा’ असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सिंधमधील हैदराबाद, लरकाना तसेच इतर ठिकाणी मंदिरांवर मागील दोन वर्षांत झालेल्या हल्ल्यानंतर ही उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. सिंध प्रांताच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव खटुमल जीवन यांनी ही माहिती दिली.
सिंध प्रांतात हिंदू, शीख व ख्रिश्‍चन यांची १ हजार २५३ धर्मस्थळे आहेत. यामध्ये अहमदी समुदायाच्या धर्मस्थळांसह ७०३ मंदिरे, ५२३ चर्च व ६ गुरुद्वार यांचा समावेश आहे. या धर्मस्थळांच्या सुरक्षेसाठी सुमारे २ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google