Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » पाकी आयएसआयच्या २४ हस्तकांना अटक

पाकी आयएसआयच्या २४ हस्तकांना अटक

=लोकसभेत सरकारची माहिती=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर –
hansraj-ahirयावर्षीच्या जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या २४ हस्तकांना अटक करण्यात आली, अशी माहिती सरकारच्या वतीने आज मंगळवारी लोकसभेत देण्यात आली.
या २४ हस्तकांव्यतिरिक्त पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायोगात काम करणार्‍या एका पाकी गुप्तचराला गेल्या महिन्यात बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मेहमूद अख्तर असे या हेराचे नाव असून, तो उच्चायुगात अधिकारी होता, असे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
या वर्षभरात ज्या हस्तकांना अटक करण्यात आली, त्यातील ९ गुप्तहेर राजस्थानमधून, सहा पंजाबमधून, दोन गुजरातमधून, दोन जम्मू-काश्मिरातून, एक उत्तर प्रदेशातून आणि चौघांना राजधानी दिल्लीत अटक करण्यात आली आहे, असे अहिर म्हणाले.
पाकिस्तान उच्चायोगात काम करणारे काही कर्मचारी पाक सरकारच्या वतीने हेरगिरीचे रॅकेट चालवत असण्याची दाट शक्यता आहे, असे सांगताना अहिर म्हणाले की, पाकी उच्चायुगात ज्या अधिकार्‍याला अटक करण्यात आली होती, त्याला लगेच देश सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला होता.
भविष्यात अशा घटनांवर आळा घालण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे. राष्ट्राची सुरक्षा आणि देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google