Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पाकी सैनिक मुद्दाम नागरिकांना लक्ष्य करताहेत

पाकी सैनिक मुद्दाम नागरिकांना लक्ष्य करताहेत

=बीएसएफचा आरोप=
bsf-jammu-frontier-ig-dk-upadhyaya-c-addressesजम्मू, [२ नोव्हेंबर] – पाकिस्तानचे सैनिक आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करताना सीमा सुरक्षा दलाच्या तळांऐवजी मुद्दामच लोकवस्त्यांवर तोफांचा मारा करून नागरिकांना लक्ष्य करीत आहेत, असा आरोप बीएसएफने केला.
पाकच्या सैनिकांनी संघर्षविरामाचे उल्लंघन करण्याचे सत्रच सुरू केले आहे. १२० आणि ८२ एमएमच्या तोफांचा ज्या पद्धतीने भडीमार केला जात आहे, ते पाहू जाता पाकी लष्कर सीमेवरील रेंजर्सना पूर्ण मदत करीत असल्याचेच दिसून येते, असे बीएसएफचे महानिरीक्षक डी. के. उपाध्याय यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना सांगितले.
आमच्या जवानांनी आजवर कधीच नागरिकांवर गोळीबार केला नाही आणि तोफगोळ्यांचा माराही केला नाही. आम्ही थेट पाकी सैनिकांच्या तळांवर हल्ले करतो. पण, पाकचे सैनिक बीएसएफ जवानांच्या तळांना लक्ष्य न करता आंतरराष्ट्रीय सीमेवरील निष्पाप नागरिकांना ठार मारत आहे, असे ते म्हणाले.
पाकने गोळीबार केल्यानंतर आम्ही एकदम त्याला प्रत्युत्तर देत नसतो. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतरच आमचे जवान पाकला त्यांच्याच भाषेत उत्तर देतात. आमचे लक्ष्य पाकी सैनिकांची तळे आणि बंकर्स उद्‌ध्वस्त करणे, हेच असते. मंगळवारी पाकच्या सैनिकांनी सीमावर्ती गावांवर तोफांचा भडीमार करून आठ नागरिकांना ठार मारले. त्यामुळे आमच्या जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देताना पाकच्या दोन सैनिकांना ठार केले आणि त्यांच्या १४ चौक्याही पूर्णपणे उद्‌ध्वस्त केल्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 3 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google