Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाक-चीन आर्थिक कॉरिडोरमध्ये काश्मीरचा अडथळा

पाक-चीन आर्थिक कॉरिडोरमध्ये काश्मीरचा अडथळा

=चीनची प्रथमच जाहीर कबुली=
वृत्तसंस्था
बीजिंग, १८ नोव्हेंबर –
global-times-chinaसुमारे ४६ अब्ज डॉलर्स खचून बांधण्यात येत असलेल्या पाकिस्तान-चीन आर्थिक कॉरिडोरमध्ये काश्मीर वाद सर्वात मोठा अडथळा ठरत आहे, अशी जाहीर कबुली चीनने प्रथमच दिली आहे.
चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीची मालकी असलेल्या ग्लोबल टाईम्सने याबाबतचे वृत्त आज प्रकाशित केले आहे. हा अब्जावधी डॉलर्सचा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात भारत आणि पाकमधील काश्मीर वाद सर्वात मोठा अडसर ठरत आहे, ही बाब आता चीन सरकारलाही मान्य झाली आहे. तथापि, हा अडसर दूर करण्यासाठी चीनने भारताला खुश करायला हवे, असा याचा अर्थ मुळीच नाही, असे या वृत्तात म्हटले आहे.
प्रादेशिक एकात्मता आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे पाहिजे तसे योगदान मिळत नसेल, तर दक्षिण आशियात महासत्ता होण्याची भारताची महत्त्वाकांक्षा देखील कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. विशेष म्हणजे, फोर्ब्ज पाक्षिकातील अलीकडील एका लेखात चीनवर या आर्थिक कॉरिडोरच्या मुद्यावरून टीका करण्यात आली होती. भारताला खुश करण्यासाठी चीनकडून आतापर्यंत कोणताही पुढाकार घेण्यात आला नाही, असे या लेखात नमूद होते.
ग्लोबल टाईम्सने आतापर्यंत नियमितपणे भारतावर टीका करणारे लेख आणि बातम्या चालविल्या आहेत. भारतावरील टीकेची एकही संधी या दैनिकाने सोडली नाही. यावेळी आपल्या ताज्या लेखात भारतावर टीका केली. पण, त्याचवेळी भारत-पाकमधील काश्मीर वादाचा या कॉरिडोरच्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचेही प्रथमच मान्य केले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 19 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google