Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » पाक म्हणजे दहशतवाद्यांचा कारखानाच

पाक म्हणजे दहशतवाद्यांचा कारखानाच

=कारवाई करा, अन्यथा महागात पडेल: अमेरिकेची ठाम भूमिका=
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २१ नोव्हेंबर –
usa-flagपाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखानाच आहे. भारत आणि अन्य देशांमध्ये भीषण घातपाती कारवाया करणार्‍या दहशतवाद्यांना याच देशात आश्रय दिला जातो. आमच्या या भूमिकेवर केवळ अमेरिका आणि भारताचे नाही, अनेक देशांचे एकमत झाले आहे. पाकने त्यांच्या देशातील दहशतवादी गटांवर वेळीच कारवाई केली नाही तर याचा अतिशय गंभीर परिणाम पाकला भोगावा लागेल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
अमेरिकेतील पाकचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी स्वत:च याबाबतची माहिती दिली. भविष्यात अमेरिकेत कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला, तर अमेरिका व पाकिस्तानमधील संबंध बिघडतील आणि अमेरिका पाकविरोधात कठोर कारवाई करण्यास अजिबात मागेपुढे पाहणार नाही, असे हक्कानी यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍यासोबत भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले.
अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ पीसच्या बैठकीत अमेरिकेच्या दक्षिण आशियातील व्यवहारांवर सातत्याने लक्ष ठेवून असणारे लीजा कार्टिस यांनीही हक्कानी यांच्या माहितीची पुष्टी केली आहे. अमेरिकेवर पुन्हा हल्ला झाला तर पाकला खूप वाईट दिवस पाहावे लागणार आहेत, असे कार्टिस यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेसोबत चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची अतिशय चांगली संधी पाकिस्तानपुढे उपलब्ध आहे. पण, त्यासाठी पाकने हक्कानी नेटवर्क, तालिबान आणि त्यांच्या भूमीत आश्रयास असलेल्या दहशतवादी गटांविरोधात ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. अमेरिकेच्या भविष्यातील कठोर कारवाईपासून स्वत:ला वाचविण्यासाठी पाकला आताच काही मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानवर बंदी घालणे, फुटीरतावादी संघटनांना चर्चेसाठी तयार करणे, यासारखे निर्णयही पाकला घ्यावे लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेत आता डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आले आहे आणि ते कट्टर मुस्लिमविरोधक आहे. त्यामुळे पाकिस्तानातून अमेरिकेत येणार्‍या नागरिकांवर ते बंदी घालण्याची शक्यता देखील नाकारता येणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google