Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पुन्हा जनता परिवार!

पुन्हा जनता परिवार!

=मुलायमसिंह, अजित सिंह, शरद यादव यांच्यात बैठक=
janata_parivarनवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] – पुढील वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचा रथ रोखण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा जनता परिवाराला एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आज बुधवारी राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह आणि जदयूचे नेते शरद यादव यांची वेगवेगळी भेट घेतली.
मुलायमसिंह यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी या बैठका झाल्या. मुलायम यांचे लहान बंधू शिवपाल यादव हे देखील या बैठक सत्रांमध्ये सहभागी होते. भाजपाला विजयापासून रोखण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्याच्या मुद्यावर त्यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्रांनी दिली. या बैठकानंतर मुलायमसिंह लखनौकडे रवाना झाले. विशेष म्हणजे, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हेदेखील आज दिल्लीतच होते.
५ नोव्हेंबर रोजी लखनौमध्ये सपाचा रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीत सपाची ताकद वाढविण्याच्या उद्देशाने उपरोक्त सर्व नेते आणि जदएसचे प्रमुख व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह अनेक नेतेमंडळी सहभागी यात सहभागी झाले होते. त्यानंतर आता दिल्लीत समाजवादी परिवाराला एकत्र आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google