Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, फिचर, युरोप » ‘पॅरिस हवामान बदल करार’ झाला आंतराष्ट्रीय कायदा

‘पॅरिस हवामान बदल करार’ झाला आंतराष्ट्रीय कायदा

unfccc-parisसंयुक्त राष्ट्रसंघ, [४ नोव्हेंबर] – पॅरिस हवामान बदल करारास आंतराष्ट्रीय कायदा म्हणून संयुक्त राष्ट्रसंघात आज शुक्रवारी मान्यता मिळाली. हवामान बदलांच्या जागतिक आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी मागील वर्षी पॅरिस हवामान बदल करार करण्यात आला होता.
हा सर्वांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल विभागाच्या प्रमुख पॅट्रिशिया ऍस्पिनोसा यांनी व्यक्त केली.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये पॅरिस येथे झालेल्या करारावर १९२ विविध देशांनी स्वाक्षरी केली होती. जगातील दोन तृतीयांश कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार असलेले ९६ देश यात सहभागी होते.
जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) दोन अंश सेल्शियसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आव्हान सध्या या देशांपुढे आहे. नजीकच्या भविष्यात आणखी काही देश सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
ज्या वेगाने हवामान बदल कराराचे कायद्यात रूपांतर झाले, त्याबद्दल शास्त्रज्ञ मंडळींनीही आनंद व्यक्त केला आहे. कृषी जमिनीचे वेगाने होणारे वाळवंटीकरण, समुद्राची वाढती पातळी या आव्हानांचा मुकाबला मिळून करणे अधिक सुलभ होईल, असा आशावाद शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, फिचर, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google