Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोलपंप चालकांचा १५ रोजी देशव्यापी बंद

पेट्रोलपंप चालकांचा १५ रोजी देशव्यापी बंद

=आजपासून मर्यादित विक्री, रविवार सुटीचा दिवस पाळणार=
petrol-pumpहैदराबाद, [४ नोव्हेंबर] – गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस पेट्रोल व डिझेल खरेदीवर बहिष्कार घालणार्‍या पेट्रोलपंप चालकांनी आता आपले आंदोलन अधिकच तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, याचाच एक भाग म्हणून येत्या १५ नोव्हेंबर रोजी देशव्यापी बंद पाळण्याचे धोरण स्वीकारले आहे.
पेट्रोल व डिझेलवरील कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, यासह इतर काही मागण्यांवर दबाव आणण्यासाठी देशभरातील पेट्रोलपंप चालकांनी आंदोलन सुरू केले आहे. आमच्या रणनीतीनुसार आम्ही दोन दिवस पेट्रोल व डिझेलची खरेदी केली नाही. आता उद्या शनिवारपासून आम्ही केवळ सकाळच्या एकाच शिफ्टमध्ये पेट्रोलची विक्री करणार आहोत. सोबतच, रविवार आणि शासकीय सुटीच्या दिवशी आम्ही पेट्रोलपंप पूर्ण दिवस बंद ठेवणार आहोत, अशी घोषणा भारतीय पेट्रोलपंप डीलर्स महासंघाने आज शुक्रवारी जाहीर केले.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर येत्या १५ नोव्हेंबर रोजी आम्ही देशव्यापी बंद पाळणार आहोत, अशी माहिती महासंघाचे संयुक्त सचिव राजीव अमराम यांनी दिली.
मागील दोन दिवस देशातील कोणत्याही पेट्रोलपंप चालकाने पेट्रोल व डिझेलची खरेदी केली नाही. आमच्या या आंदोलनाचा ग्राहकांनाच फटका बसला असला, तरी नाईलाजाने आम्हाला आंदोलन पुढेही सुरूच ठेवावे लागणार आहे. शनिवारपासून सकाळी ९ ते सायंकाळी सहा या एकाच शिफ्टमध्ये पेट्रोलची विक्री होईल, असेही त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google