Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल पंप, टोल नाके येथे ५०० च्या जुन्या नोटा बंद!

पेट्रोल पंप, टोल नाके येथे ५०० च्या जुन्या नोटा बंद!

=शुक्रवार मध्यरात्रीपासून निर्णय अमलांत=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ डिसेंबर –
toll-nakaपेट्रोल पंप, टोल नाके आणि विमानांच्या तिकीट खरेदीसाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. याआधी ही मुदत १५ डिसेंबर असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता नव्या निर्णयानुसार, सरकारी तेल कंपन्यांच्या आधिपत्याखालील पेट्रोल- डिझेल पंप तसेच विमान प्रवासाची तिकीटे काढण्यासाठी जुन्या पाचशेच्या नोटा वापरता येणार नाहीत. १००० च्या नोटांचा व्यवहारातील वापर यापूर्वीच बंद करण्यात आला आहे.
२४ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थ व्यवहार सचिवांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, देशभरातील टोल नाके २ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार होते. त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत मात्र, जुन्या ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता तो आदेश रद्द झाला आहे. ३ डिसेंबरपासून म्हणजेच २ आणि ३ तारखेच्या मध्यरात्री टोलनाके सुरू होतील, मात्र, तिथे पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत.
टोल नाक्यांवर कूपन्सचा प्रस्ताव
दरम्यान, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि रस्ते मंत्रालयाने आता देशभरातील टोलनाक्यांवर पैशांऐवजी कूपन्स वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. टोल भरताना पाच ते १०० रूपये मुल्याची कूपन्स देण्यात यावी, असे या प्रस्तावात म्हटले आहे. टोल भरल्यानंतर संबंधित वाहनधारकाला उर्वरित सुट्टे पैसेदेखील कूपन्सच्या स्वरुपातच परत देण्याचेही या प्रस्तावात म्हटले आहे.
इथे स्वीकारल्या जातील ५००च्या जुन्या नोटा
नगरपालिका, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांची थकबाकी किंवा पाणीकराचा भरणा जुन्या पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये भरण्यासाठी, पूर्वीच जाहीर करण्यात आलेली १५ डिसेंबरची मुदत कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवासाच्या तिकीटासाठीही जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा १५ डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. नोटबंदीनंतर ५००च्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बँकेत बदलू शकता. ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेतही या नोटा बदलता येतील.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google