Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » पैसा जाहीर केला तर ५०% ; पकडल्यास ८५ टक्के कर

पैसा जाहीर केला तर ५०% ; पकडल्यास ८५ टक्के कर

=काळा पैसाधारकांना चाप=
हिंदुस्थान समाचार,
मुंबई, दि. २८ नोव्हेंबर-
loksabha-parliamentनोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा धारकांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. बँक खात्यात जमा होणार्‍या बेहिशेबी रकमेवर ५० टक्के कर लावण्याचा प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आला आहे. मात्र बेहिशेबी रक्कम आयकर विभागाने पकडल्यास त्यावर तब्बल ८५ टक्के कर लावावा असे या प्रस्तावात म्हटले आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांमध्ये जमा झालेल्या बेहिशेबी रकमेवर भरभक्कम कर लावण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी एक पाऊल पुढे टाकले. सोमवारी लोकसभेत विरोधकांचा गोंधळ सुरु असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्राप्तिकर सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. या सुधारित विधेयकानुसार ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत जमा झालेल्या बेहिशेबी रकमेवर कर लावण्याचा प्रस्ताव आहे.
यामध्ये बेहिशेबी रकमेवर ३० टक्के कर, १० टक्के दंड आणि ३३ टक्के सरचार्ज  कारला जाईल. हा सरचार्ज एकूण कराच्या १३ टक्के असणार आहे. या सरचार्जला ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण सेस’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र जो व्यक्ती बेहिशेबी रक्कम स्वतःहून जाहीर करणार नाही आणि आयकर विभागाने त्याला पकडले तर अशा काळा पैसाधारकांची कोंडी होणार आहे. अशा व्यक्तींना ७५ टक्के कर आणि १० टक्के दंड भरावा लागेल.
प्रस्तावानुसार बेहिशेबी संपत्ती जाहीर करणार्‍याचे नाव उघड केले जाणार नाही. याशिवाय काळा पैसा धारकांना जाहीर केलेल्या रकमेच्या २५ टक्के रक्कम ही गरीब कल्याण योजनेच्या निधीत जमा करावी लागेल. या पैशांचा वापर शिक्षण, आरोग्य, सिंचन, पायाभूत सुविधा, शौचालय अशा विविध कामांसाठी केला जाणार आहे. चार वर्षांसाठी हे पैसे या योजनेसाठी वापरले जातील.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google