Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » पॉल बेट्‌टी यांना ‘बुकर’ पुरस्कार

पॉल बेट्‌टी यांना ‘बुकर’ पुरस्कार

=पहिलेच अमेरिकन साहित्यिक=
poul-beatty-booker-winnerलंडन, [२६ ऑक्टोबर] – अमेरिकेचे लेखक पॉल बेट्‌टी यांना यंदाच्या प्रतिष्ठेच्या ‘मॅन बुकर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. साहित्य-पुरस्कारांच्या इतिहासात प्रथमच अमेरिकन लेखकाला ‘बुकर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. पॉल बेट्‌टी यांच्या प्रसिद्ध  ‘दि सेलआऊट’ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला. चार तास चाललेल्या बैठकीनंतर निवडमंडळाने एकमताने लेखक पॉल बेट्‌टी  यांच्या ‘दि सेलआऊट’ या कादंबरीची निवड केली. ५० हजार पाऊंडचा हा पुरस्कार आहे. ‘स्तब्ध करणारी कलाकृती’ असे वर्णन निवडमंडळाने या कलाकृतीसंदर्भात केले.
अमेरिकेतील कृष्णवर्णीय-अमेरिकन वंशाच्या गुलामांची बहुसंख्या असलेले एक शहर काळाच्या ओघात नाहीसे होते. त्यानंतर ते पुन्हा वसवताना श्‍वेतवर्णीयांना खालची वागणूक देण्याचा कसा प्रयत्न होतो, हे बेट्‌टी यांनी यामध्ये तिरकस शैलीत मांडले आहे. वंशवाद आणि वर्णभेदावर मार्मिक प्रहार करणार्‍या या कादंबरीत ५४ वर्षीय बेट्‌टी यांनी एका आफ्रिकी-अमेरिकन व्यक्तीचे चित्रण केले आहे.
हास्य, व्यंग्य आणि विडंबन यांचा सढळहस्ते उपयोग बेट्‌टी यांनी दि सेलआऊटमध्ये केला आहे. निवडमंडळाने या कलाकृतीची तुलना मार्क ट्‌वेन आणि जोनाथन स्विफ्ट यांच्या साहित्यासोबत केली.
‘दि सेलआऊट’मध्ये श्‍वेतवर्णीयांइतकीच कृष्णवंशीयांची दांभिकता यामध्ये त्यांनी पुढे आणली आहे. सामाजिक  सांस्कृतिक चळवळी, राजकीय उलथापालथ यांचा वेध घेत बेट्‌टी यांनी अमेरिकन समाजाचे चित्रण केले. एक निनावी कृष्णवंशीय निवेदक देशाच्या सर्वोच्च न्यायालयापुढे आपले निवेदन सादर करतो. अमली पदार्थाच्या नशेखाली आपण इथवर येण्यापर्यंत काय-काय केले त्याचा तपशील तो मांडतो.
मला लेखनाचा तिटकारा!
लंडनच्या गिल्ड सभागृहात आयोजित एका समारंभात पॉल बेट्‌टी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. अतिशय भावूक झालेले बेट्‌टी यांच्या प्रतिक्रियेमुळेही रसिक अवाक झालेत. ‘मला लेखनाचा तिटकारा आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली!

शेअर करा

Posted by on Oct 27 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google