Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » प्रख्यात गायक लिओनार्ड कोहेन यांचे निधन

प्रख्यात गायक लिओनार्ड कोहेन यांचे निधन

=मृत्यूचे कारण आणि निधनाची तारीख याबाबत गूढ=
leonard-cohen-dies-at-82-singer-songwriterलॉस एंजेलिस, [११ नोव्हेंबर] – प्रख्यात कॅनेडियन गायक आणि गीतकार लिओनार्ड कोहेन यांचे लॉस एंजेलिस येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या एकाहून एक सरस अशा गीतांनी संगीतप्रेमींना भुरळ घातली होती. लिओनार्ड कोहेन यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या मृत्यूविषयीची माहिती सोनी म्युझिक कंपनीने आज शुक्रवारी जाहीर केली. मृत्यूचे कारण आणि निधनाची तारीख मात्र देण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन्हीबाबत गूढ वाढले आहे.
प्रख्यात गीतकार आणि गायक कोहेन यांचे निधन झाल्याची माहिती देताना दुःख होत आहे. संगीत क्षेत्रातील एक महान व्यक्तीमत्व हरपले, अशी पोस्ट सोनी म्युझिकने टाकली आहे. लॉस एंजेलिसमध्येच कोहेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या मृत्यू कसा झाला याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
कोहेन हे तरूणपनी न्यूयॉर्कला आले. त्यांनी रॉक गाण्यांनी यशाचे शिखर गाठले. अनेक समीक्षकांनी त्यांची तुलना नोबेल पुरस्कार विजेते गायक आणि गीतकार बॉब डिलन यांच्या गाण्यांशी केलेली आहे. कोहेन यांनी संगीत क्षेत्रातील अनेक कलावंतांना प्रेरित केले. रॉक अँड रॉल हॉल ऑफ फेम, ऑर्डर ऑफ कॅनडा, जीवनगौरव पुरस्कार या सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
हिंदू धर्मातील अद्वैत तत्त्वज्ञानाकडे ओढा
लिओनार्ड कोहेन हे वृत्तीने धार्मिक होते. अद्वैत तत्त्वज्ञानाचे प्रसिद्ध अभ्यासक आणि उपासक रमेश बालसेकर यांच्या भेटीसाठी ते काही वर्षांपूर्वी मुंबईत आले होते. बालसेकर यांच्याकडून त्यांनी हिंदू धर्मातील अद्वैत तत्त्त्वज्ञानाबाबत मार्गदर्शन यावेळी घेतले होते.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google