Home » छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » प्रदूषणामुळे विदेशी पर्यटकांचा दिल्लीला ठेंगा

प्रदूषणामुळे विदेशी पर्यटकांचा दिल्लीला ठेंगा

=राजधानीच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम, हिमाचल प्रदेशला मात्र फायदा=
delhi-is-now-not-the-most-polluted-city-in-the-worldनवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठल्याचे विपरीत परिणाम दिल्लीकरांच्या आरोग्याबरोबरच येथील पर्यटन व्यवसायावरही दिसू लागले आहेत. भारतात पर्यटनासाठी आलेले अनेक परदेशी पर्यटक प्रदूषणामुळे दिल्लीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. त्याऐवजी हे पर्यटक नजीकच्या थंड हवेच्या ठिकाणांवर जाण्यास पसंती देत आहेत. काही परदेशी पर्यटकांनी दिल्लीच्या प्रदूषणाचा अनुभवही घेतला आहे. मी गेल्या आठवड्यात दिल्लीत होते. मात्र, त्याठिकाणी धुके व धुराच्या पातळीत लक्षणीय रीत्या वाढ झाली असून प्रदूषणामुळे घशाला कोरड पडत असल्याचे एका परदेशी महिलेने सांगितले. त्यामुळे बहुतांश पर्यटकांनी सिमला आणि धर्मशाळा ही थंड हवेची ठिकाणे गाठली आहेत. यामुळे एकीकडे दिल्लीच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होत असताना हिमाचल प्रदेशमधील हॉटेल मालकांचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात आमच्याकडे थेट येणार्‍या पर्यटकांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती हिमाचल पर्यटन महामंडळाच्या बुकिंग अधिकार्‍यांकडून देण्यात आली.
राष्ट्रीय हरित लवादाकडून या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित राज्यांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या, असा सवाल लवादाकडून दिल्ली, राजस्थान, हरयाणा आणि पंजाब आणि केंद्र सरकारला विचारण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाने शनिवारी आणि रविवारी सर्वोच्च सीमा पार केली होती. दिल्लीत १० तास घालवणे म्हणजे ४० पेक्षा अधिक सिगारेट ओढण्यासारखी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील शाळांना तीन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच उत्पादनावर पाच दिवस बंदी घातली असून दिल्लीमधील उत्पादन क्षेत्रातील उद्योगातून निर्माण होणारा घनकचरा नष्ट करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. पुढील दहा दिवस शहरामध्ये जनरेटरच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. रुग्णालय तसेच महत्त्वाच्या ठिकाणी ही बंदी शिथिल असेल. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन दिल्ली सरकारने केले आहे. दिल्लीत पाला-पाचोळा जाळण्यावर देखील बंदी घालण्यात आली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन तयार केले जात आहे.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google