Home » छायादालन, ठळक बातम्या, फिचर, राष्ट्रीय, सांस्कृतिक » प्रसिद्ध कर्नाटकी शास्त्रीय गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे निधन

प्रसिद्ध कर्नाटकी शास्त्रीय गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे निधन

वृत्तसंस्था
चेन्नई, दि. २२ नोव्हेंबर –
m-balamuralikrishnaकर्नाटकी शास्त्रीय संगीताला जगात नवी उंची मिळवून देणारे प्रसिद्ध गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे आज निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. चेन्नईमध्ये आपल्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
बालमुरलीकृष्ण यांचा जन्म ६ जुलै १९३० ला आंध्रप्रदेशात झाला होता. ते एक प्रसिद्ध शास्त्रीय गायक म्हणून सर्वांना ज्ञात होतेच मात्र याव्यतिरिक्त त्यांनी संगीतकार आणि अभिनेता म्हणूनही भूमिका बजावली होती. वयाच्या सहाव्या वर्षापासून संगीत क्षेत्रात त्यांच्या कारकिर्दीला सुरूवात झाली. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. बालमुरलीकृष्ण हे एकमेव संगीतकार आहेत ज्यांना फ्रांस सरकारकडून २००५ साली ’चेवेलियर्स ऑफ द ऑर्डर डेस आर्ट्स एट डेस लेटर्स’ सन्मान मिळाला आहे. तसचं आत्तापर्यंत त्यांनी जगभरात २५००० पेक्षा जास्त संगीत कार्यक्रम सादर केले आहेत.
बालमुरलीकृष्ण यांनी कन्नड, तेलगु, संस्कृत, तमिळ, मल्याळम, हिंदी, पंजाबी आणि बंगाली यांसारख्या असंख्य भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. बालमुरलीकृष्ण हे व्हायोलिन, मृदंग आणि मंजीरा वाजवण्यातही निष्णात होते. तसचं ४०० पेक्षा जास्त गाण्याना त्यांनी संगीत दिले आहे. १९६७ च्या ’भक्त प्रल्हाद’ या सिनेमातून त्यांनी पहिल्यांदा अभिनयही केला होता. पंडित भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासमवेतही त्यांच्या जुगलबंदी अनेकांच्या स्मरणात आहेत. कर्नाटकचे संगीत महर्षी म्हणूनही त्यांची सर्वत्र ख्याती होती. कर्नाटक शास्त्रीय संगीताला जागतिक पातळीवर पोहोचवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने संगीत कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल चे. विद्यासागर राव तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, फिचर, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google