Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » प्रा. एम. जी. के. मेनन यांचे निधन

प्रा. एम. जी. के. मेनन यांचे निधन

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर –
prof-mgk-menonगेल्या पाच दशकांच्या काळात देशातील विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ प्रा. एम. जी. के. मेनन यांचे आज मंगळवारी सकाळी आजारापणामुळे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. व्ही. पी. सिंह सरकारमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान तसेच शिक्षण मंत्री राहिलेले मेनन यांनी केंद्र सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण विभागानत सचिव म्हणूनही काम केले होते. याशिवाय, १९७२ मध्ये त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोतही अध्यक्षपद भूषविले होते. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संचालकही होते. पद्म विभूषण पुरस्कार प्राप्त मेनन यांनी ब्रह्मांडीय किरणे आणि कण भौतिक विज्ञानाच्या संशोधनातही आपले अमूल्य योगदान दिले आहे. ते १९८२ ते १९८९ या काळात नियोजन आयोगाचे सदस्य, १९८६ ते ८९ या काळात पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, १९८९ ते १९९० या काळात कौन्सिल ऑफ सायन्टिफिक ऍण्ड इंडस्ट्रीयल रिसर्चचे उपाध्यक्ष आणि १९९० ते ९६ या काळात राज्यसभेचे सदस्यही होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google