Home » छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक » प्रेरणा शिबिराच्या ‘प्रेरणापुष्प’ प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रेरणा शिबिराच्या ‘प्रेरणापुष्प’ प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

img-20161111-wa0011तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [११ नोव्हेंबर] – राष्ट्र सेविका समितीच्या अ. भा. प्रेरणा शिबिराच्या निमित्ताने आयोजित प्रेरणापुष्प प्रदर्शनीचे उद्‌घाटन आज समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनीला शिबिरासाठी आलेल्या सेविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्व अशी संकल्पना असलेल्या या प्रदर्शनात देशातील प्रेरणादायी महिला आणि पुष्प यांची अतिशय सुरेख सांगड घालण्यात आली आहे. पुराणकाळापासून आतापर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांचा परिचय या प्रदर्शनातून करुन देण्यात आला आहे. यात वागाम्भुनी, कौसल्या, सीता, कुंती, द्रौपदी, गांधारी, क्षत्राणी विदुला, २० अश्‍वमेध यज्ञ करणारी नागनिका, राणी चेन्नमा, देवी अहल्याबाई, केरळमध्ये साक्षरतेचा पाया घालणारी राणी सेतूलक्ष्मी आणि प्रजापती गौतमी यांचा कर्तृत्ववान महिलांच्या गटात समावेश आहे.
गोळवलकर गुरुजींची आई ताई गोळवलकर, आचार्य विनोबा भावे यांची आई रुख्मिणी भावे, श्यामची आई यांचा मातृत्व गटात समावेश आहे. नेतृत्व गटात हिराबाई बडोदेकर, सुब्बा लक्ष्मी, प्रतियेती, अमृता बिश्‍नोई, वंदना शिवा, भगिनी निवेदिता, अंतराळवीर सुनिता पंड्या, मावशी केळकर यांच्या कार्याचा परिचय करुन देण्यात आला आहे. या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा परिचय करुन देतांना निसर्गातील फुलही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा संदेश देत असतात, त्यांचा परिचयही या प्रदर्शनातून करुन देण्यात आला आहे.
रा. से.समितीच्या ८० वर्षाच्या वाटचालीचा परिचय दुसर्‍या एका प्रदर्शनातून करुन देण्यात आला आहे. देशभरातील समितीच्या कार्याची ओळख करुन देतांना समितीच्या आतापर्यंत झालेल्या मोठ्या शिबिरांची ओळख छायाचित्रांच्या माध्यमातून करुन देण्यात आली आहे. १९५३ मध्ये झालेल्या शिबिराची माहिती देणारी त्या वेळच्या वृत्तपत्राील बातम्यांची कात्रणेेही प्रदर्शनाच्या आकर्षणाचे केंद्र होते. चित्रा जोशी आणि अन्य सेविकांच्या मेहनतीतून हे प्रदर्शन साकारण्यात आले आहे. प्रदर्शन पाहणार्‍यांना चित्रा जोशी मोठ्या उत्साहाने या प्रदर्शनामागची संकल्पना स्पष्ट करुन सांगत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रदर्शनीला भेट देऊन त्याचे कौतुक केले.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google