Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » ‘बीएचआर’च्या १४ संचालकांना अटक

‘बीएचआर’च्या १४ संचालकांना अटक

bhr-fulllogoतभा प्रतिनिधी
पुणे, [४ नोव्हेंबर] – मुदत संपल्यानंतरही ग्राहकांचे पैसे परत न केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑफ क्रेडीट सोसायटी लि.च्या संचालक मंडळातील चौदा जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, विशेष न्यायाधिश ए. डब्ल्यू. चांदवाणी यांनी ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
प्रमोद भाईचंद रायसोनी, इंद्रकुमार आत्माराम लालवानी, डॉ. हितेंद्र यशवंत महाजन, सुकलाल शहादु माळी, दिलीप कांतीलाल चोरडीया, भगवान हिरामण वाघ, भागवत संपत माळी, शेख रमजान शेख अब्दुल नबी, ललिता राजू सोनवणे, सुरजमल बभुतमल जैन, राजाराम काशीनाथ कोळी, मोतिलाल ओंकार जिरी, दादा रामचंद्र पाटील, यशवंत ओंकार जिरी अशी पोलीस कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुरेख दतात्रय निकम यांनी फिर्याद दिली होती.
आरोपी जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑफ क्रेडीट सोसायटी लि.च्या संचालक मंडळावर आहेत. त्यांच्या संस्थेची शाखा धायरी फाटा येथे आहे. संचालक मंडळाने जाहिरातीद्वारे बीएचआर ठेव योजना, सुवर्णलक्ष्मी मासिक प्राप्ती योजना, विशेष ठेव योजना, आर्वतक ठेव, संजीवनी ठेव योजना आदी योजनांद्वारे गुंतवणुकदारांना १३ टक्के व्याजदराचे आमिष दाखवले होते. याव्दारे त्यांनी ठेवीदारांना ४२ लाख ५७ हजार ७९ रुपये गुतवण्यास भाग पाडले. योजनची मुदत संपल्यानंतरही गुंतवणुकदारांना लाभांश, व्याज, फायदा यापैकी कोणतीही परतफेड करण्यात आली नाही. फिर्यादी व इतर ग्रांहकांची फसवणूक केल्याप्रकरणी संचालक मंडळाच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात २२ जून रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपींकडे गुन्ह्यासंदर्भात अधिक तपास करायचा असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील सुनिल हांडे यांनी केली होती.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google