Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » बीएसएफने टिपले १५ पाकी सैनिक

बीएसएफने टिपले १५ पाकी सैनिक

=नापाक गोळीबाराला सडेतोड उत्तर=
indian-army-soldiers-apजम्मू, [२८ ऑक्टोबर] – पाकिस्तानी सैनिकांच्या नापाक गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर देताना भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकच्या १५ सैनिकांचा खात्मा केला. तर पाकच्या गोळीबारात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू व दोघे जखमी झाले.
पाकच्या सैनिकांनी स्वयंचलित बंदुका आणि तोफांचा वापर करून नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजतापासून जोरदार मारा सुरू केला. जम्मू, कठुआ, पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातील लष्कर व बीएसएफच्या तळांसोबतच सीमावर्ती भागातील अनेक गावांवर पाकच्या बंदुका व तोफांनी नुसतीच आग ओकली.
पाकच्या गोळीबाराला आमच्या जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेवरून  सडेतोड प्रत्युत्तर दिले. आमच्या कारवाईत पाकी सैनिकांच्या अनेक चौक्या उद्‌ध्वस्त झाल्या. गुलाम काश्मिरातील शक्करगढ परिसर अक्षरश: उद्‌ध्वस्त झाला आहे. पाकच्या अनेक चौक्या उद्‌ध्वस्त करीत, बीएसएफने टेहळणी टॉवर उडवले.  या कारवाईत १५ सैनिक ठार, तर अनेक जण जखमी झाले आहेत, असे बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक अरुण कुमार यांनी पत्रकारांना सांगितले.
पाकने कठुआ सेक्टरमध्ये अतिशय भीषण मारा केला. हिरानगर आणि सांबापर्यंत त्यांचे तोफगोळे पोहोचले होते. आज पहाटे पाच वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा धगधगत होती. पाकने बीएसएफच्या २४ तळांना आपल्या हल्ल्याचे लक्ष्य बनविले होते, असे अरुण कुमार म्हणाले.
पाकच्या गोळीबारात पालनवाला सेक्टरमधील खोर येथे एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर आर. एस. पुरा सेक्टरमध्येही एक नागरिक ठार झाला. अन्य दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाकच्या लष्कराची मदत
पाकचे सैनिक आंतरराष्ट्रीय सीमेवर ज्या प्रकारच्या तोफगोळ्यांचा मारा करीत आहेत आणि गोळीबार करीत आहेत, त्यावरून पाकिस्तानचे लष्कर यात त्यांना सहकार्य करीत असल्याचेच स्पष्ट होते. कारण, १२० एमएमच्या तोफांचा मारा करण्याचे कौशल्य रेंजर्समध्ये नसते. त्यासाठी लष्करातील निष्णात अधिकार्‍यांचीच मदत घ्यावी लागते, अशी माहिती त्यांनी दिली.

शेअर करा

Posted by on Oct 29 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google