Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » ब्राझीलच्या फुटबॉलपटूंच्या विमानाला अपघात, ७६ ठार

ब्राझीलच्या फुटबॉलपटूंच्या विमानाला अपघात, ७६ ठार

=केवळ पाच जण सुदैवाने बचावले=
वृत्तसंस्था
बोगोटा, २९ नोव्हेंबर –
the-plane-carrying-brazilian-football-team-chapecoense-which-reportedly-crashes-in-colombiaब्राझीलच्या प्रथम श्रेणी फुटबॉल संघातील सदस्यांसह ८१ जणांना घेऊन कोलम्बियाकडे जाणार्‍या विमानाला हवेतच अपघात झाला. यात ७६ जणांचा मृत्यू झाला असून, केवळ पाच जणच सुदैवाने बचावले आहेत.
प्रादेशिक स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्याकरिता ब्राझीलचा संघ, संघाचे प्रशिक्षक व इतर काही अधिकारी या चार्टर विमानातून जात होते. कोलम्बियातील मेडेलिन आंतरराष्ट्रीय विमानतळजवळ असतानाच शहराबाहेरील पर्वतीय भागात विमानाला हवेतच अपघात झाला आणि ते खाली कोसळले. हा अतिशय दुर्दैवी अपघात आहे, अशी प्रतिक्रिया मेडेलिनचे मेयर फेडेरिको गुटीरेज यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
हे विमान ब्रिटिश एरोस्पेसचे होते आणि बोलिव्हिएक चार्टर एअरलाईन्सतर्फे ते हाताळले जात होते. विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर वैमानिक हवाई नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर विमानतळ व आसपासच्या परिसरात आणिबाणी जाहीर करण्यात आली होती. रडारच्या माध्यमातून विमानावर लक्ष ठेवून असलेल्या अधिकार्‍यांनी तातडीने मदत व बचाव पथके रवाना केली होती. पण, दाट धुक्यामुळे पथकांना अपघातग्रस्त ठिकाणापर्यंत वेळीच पोहोचता आले नाही. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्याचा परिणामही वातावरणावर पडला होता.
किमान पाच ते सहा जखमींना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयाकडे नेण्यात आले. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे, असे सूत्रांनी सांगितले. विमानात ७२ प्रवासी आणि ९ कर्मचारी होते. तीन फुटबॉलपटू, एक पत्रकार आणि एक विमान कर्मचारी अपघातातून बचावले.
ब्राझीलच्या शॅपाकोईन्सी संघाचा दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल चषकाच्या अंतिम फेरीत मेडेलिनच्या ऍटलेटिको नेसियोनाल संघासोबत सामना होता. अपघातामुळे हा अंतिम सामना स्थगित करण्यात आला.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google