Home » उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » भाजपाची परिवर्तन यात्रा प्रारंभ

भाजपाची परिवर्तन यात्रा प्रारंभ

♦उत्तरप्रदेशला गुंडगिरीतून मुक्तता देऊ
♦अमित शाह यांचा सपा, बसपावर जोरदार हल्ला,
amit-shah_parivartan-yatra सहारनपूर, [५ नोव्हेंबर] – एकीकडे समाजवादी पार्टी आपल्या रौप्य महोत्सवातून भाजपावर हल्ला करीत असतानाच, भाजपाने आज उत्तरप्रदेशच्या सहारनपूर येथून पक्षाच्या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला. सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांनी राज्याला विकासापासून सातत्याने दूर ठेवले, असा आरोप करीत, केवळ भाजपाच विकास करू शकतो, असा दावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला.
उत्तरप्रदेशच्या पश्‍चिमेकडील या जिल्ह्यात भाजपाच्या प्रचाराचे नारळ फोडताना अमित शाह यांनी बसपा व सपाच्या आजवरच्या धोरणांचा पंचनामा केला. विकासाची दृष्टी नसलेल्या या दोन पक्षांनीच राज्यावर सत्ता केली. पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीनंतर bjp-parivartan-yatraभाजपा येथे स्वबळावर सत्तेवर येणार असून, त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या माफिया व गुंडाराजमधून हे राज्य पूर्णपणे मुक्त झालेले असेल, असे अमित शाह यांनी सांगितले.
एकीकडे मुख्यमंत्री अखिलेश यादव आपल्या काकांवर कुरघोडी करीत असतात आणि दुसरीकडे मायावती या दोघांवरही आघात करीत असतात. ते आपसातच भांडत आहेत. कोणालाही राज्याच्या विकासाची चिंता नाही. सत्तेच्या या भांडणात आपण राज्याला किती मागे नेले आहे, याची जाणीवही त्यांना नाही, असा आरोपही त्यांनी केला.
समाजवादी पार्टी केवळ गुंडांचीच आहे. या पक्षातील माफिया राज्याची लूट करीत आहेत. बेकायदेशीर खाण उत्खनन आणि भ्रष्टाचारानेच या सरकारची कारकीर्द गाजली आहे. मायावती म्हणतात की, केवळ बसपाच राज्याचा विकास करू शकते. पण, त्यांच्याकडेही नसिमुद्दिन सिद्दिकीसारखा माफिया आहे. या राज्यातील जनतेकरिता हे दोन्ही पक्ष म्हणजे एकीकडे खाई आणि दुसरीकडे समूद्र अशी झालेली आहे, असे त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google