Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » भारताला सर्वात मोठी खुली अर्थव्यवस्था करणार

भारताला सर्वात मोठी खुली अर्थव्यवस्था करणार

=निर्भयपणे गुंतवणूक करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन=
PM Modi in Tokyoटोकियो, [११ नोव्हेंबर] – भारताला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज आहे आणि जगातील सर्वात मोठी खुली अर्थव्यवस्था म्हणून भारताला विकसित करण्याचा आपल्या सरकारचा निर्धार आहे, असे जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी जपानी गुंतवणूकदारांना भारतात येण्याचे आवाहन केले.
भारत-जपान व्यावसायिक फोरमच्या बैठकीत व्यावसायिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या मुद्यावर सरकारने केलेली प्रगती आणि अन्य धोरणात्मक सुधारणांची सविस्तर माहिती दिली. देशातील वातावरण व्यवसायासाठी सर्वाधिक पोषक करण्यासाठी आपल्या सरकारने आतापर्यंत अनेक ठोस पावले उचलली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भारत आर्थिक सुधारणांच्या नव्या दिशेकडे वेगाने वाटचाल करीत आहे. ‘मेक इन इंडिया’ला गती देण्यासाठी आणखी काही सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. व्यवसायासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करतानाच अधिक स्थिर आणि पारदर्शक नियम व्यवस्था आणण्यावरही आपल्या सरकारचा भर असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
जपानच्या सम्राटांची भेट
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी जपानचे सम्राट अखिहितो यांची भेट घेतली आणि भारत व जपानच्या समान हितांवर आणि आशियाच्या भवितव्यावर सविस्तर चर्चा केली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विटरवर या भेटीची माहिती दिली.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google