Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारतासह आशिया खंडाची परंपरा जपेन : अनिरुद्ध राजपूत

भारतासह आशिया खंडाची परंपरा जपेन : अनिरुद्ध राजपूत

aniruddha-rajputतभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] – आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाच्या असलेल्या उत्तम प्रतिमेमुळे माझी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर (खङउ) बहुमताने निवड झाली आहे. विधी आयोगाचा सदस्य म्हणून येत्या काळात जागतिक स्तरावर भारतासह आशिया खंडाची गौरवशाली पंरपरा जपणार असल्याच्या भावना डॉ. अनिरुद्ध राजपूत यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. अनिरुद्ध राजपूत यांची नुकतीच संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर बहुमताने  निवड झाली आहे. डॉ. राजपूत यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र परिचय केंद्रामध्ये गौरव समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन डॉ. राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक यांनी यावेळी डॉ. राजपूत यांच्या आई डॉ. वसुंधरा आणि वडील डॉ. धनंजय, खासदार अढळराव पाटील, पीटीआयचे वरिष्ठ संपादक विजय सातोकर, पत्रकार  सुनील चावके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. राजपूत म्हणाले, भारत देशाची जागतिक स्तरावर असलेली उत्तम प्रतिमा आणि परराष्ट्र मंत्रालयाने या निवडीसाठी घेतलेली प्रंचड मेहनत यामुळेच संयुक्त राष्ट्र संघाच्या विधी आयोगावर माझी आाशिया खंडातून भारताचा प्रतिनिधी म्हणून बहुमताने निवड झाली. भारताच्या इतिहासात हा बहुमान मिळवून देण्याची संधी मला मिळाली त्याचा मला अभिमान असल्याचे ते म्हणाले. ही निवड प्रक्रिया अत्यंत मानाची आणि तितकीच कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचारासाठी दिवसाला १९ बैठकांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी जगातील एकूण १२० देशांमध्ये प्रचार केला. संयुक्त राष्ट्र संघाच्या एकूण १९३ सदस्य देशांपैकी जगाच्या ५ विभागांतून ३४ सदस्यांची निवड करण्यात येते. आशिया खंडातून निवड झालेल्या ७ सदस्यांपैकी डॉ. राजपूत यांना पहिल्या क्रमांकाचे मत मिळाले असूत विधी आयोगाच्या इतिहासात ते सर्वात कमी वयाचे (३३ वर्ष) सदस्य ठरले आहेत.
या निवडीमुळे आपण जागतिक स्तरावर हवामान बदलासंबंधी कायदा निर्माण करणे, पारंपरिक कायदे परिभाषित करणे आणि विविध समस्यांवर नेमण्यात आलेल्या लवादाबाबतच्या प्रक्रियेचे नियम तयार करण्यावर भर देणार असल्याचे डॉ. राजपूत म्हणाले. त्यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय विधी आयोगाची भूमिका, कार्य, नियम आणि कायदे यासंबंधी सविस्तर माहिती दिली. उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची डॉ. राजपूत यांनी दिलखुलास उत्तर दिली.
हा सन्मान स्मृतीत जपेन : डॉ. राजपूत
आंतरराष्ट्रीय विधी आयोगावरील निवडीमुळे सर्व स्तरांतून माझे अभिनंदन व कौतुक झाले, पण महाराष्ट्र परिचय केंद्राने आयोजित केलेला गौरव समारंभ म्हणजे आपल्या माणसांनी थोपटलेली पाठ आहे. त्यामुळे आपल्या माणसांनी दिल्लीत केलेला माझा सत्कार मी कायम स्मृतीत जपेन, अशा भावना डॉ. राजपूत यांनी यावेळी व्यक्त केल्या.
जगाच्या कल्याणासाठी झालेला राज्याभिषेक 
या प्रसंगी बोलताना डॉ. राजपूत यांच्या आई डॉ. वसुंधरा राजपूत यांनी, अनिरुद्धची निवड ही जगाच्या कल्याणासाठी झालेला राज्याभिषेक आहे, असे म्हटले. जुन्नरमध्ये शाळा शिकत असताना शिवनेरीच्या पायथ्यापासून या गडाकडे पाहून मी जिजाऊप्रमाणे बाळ घडविण्याचा प्रण केला होता. आज या प्रयत्नांना फळ आले आहे, असे त्या म्हणाल्या.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अढळराव पाटील, विजय सातोकर यांनी यावेळी आपले विचार मांडले. उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google