Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारतीय उच्चायोगातील तिघे मायदेशी परतले

भारतीय उच्चायोगातील तिघे मायदेशी परतले

indianhighcommissionislamabadइस्लामाबाद, [८ नोव्हेंबर] – येथील भारतीय उच्चायोगातील आठ अधिकार्‍यांवर पाकिस्तान सरकारने हेरगिरी आणि देशविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप ठेवल्यानंतर यातील तीन अधिकारी आज मंगळवारी मायदेशी परत आलेत.
पाकमधील जिओ न्यूज या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. वाणिज्य सचिव अनुराग सिंह, विजय कुमार वर्मा आणि माधवन नंदकुमार हे तिघेही आज सकाळी अमिरात एअरलाईन्सच्या विमानाने दुबई इस्लामाबादहून दुबईकडे निघाले आणि तिथून ते भारतात आले, असे या वृत्तात म्हटले आहे. तर, राजेशकुमार अग्निहोत्री, अमरदीप सिंग भट्टी, धर्मेंद्र सोधी, बलबिर सिंग आणि जयाबालन सेंथिल हे अन्य पाच अधिकारी वाघा सीमेवरून वाहनाने भारताकडे निघणार असल्याचे या वृत्तात नमूद आहे.
पाकच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते नाफीज झकारिया यांनी गेल्या आठवड्यात या आठही भारतीय अधिकार्‍यांवरील आरोप एका पत्रपरिषदेत वाचून दाखविले होते. राजनयिक मिशनवर असलेले हे सर्व अधिकारी पाकमधील दहशतवाद्यांसोबत समन्वय साधतात आणि पाकविरोधी कारवायांना प्रोत्साहन देत असतात. हे सर्व अधिकारी रॉ आणि आयबीचे सदस्य आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.
उपउच्चायुक्तांना समन्स
दरम्यान, अन्य एका घडामोडीत पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारताचे उपउच्चायुक्त जे. पी. सिंग यांना समन्स जारी करून बोलावून घेतले आणि सीमेवर भारतीय जवान सातत्याने गोळीबार करीत असल्याचा आरोप ठेवत निषेध व्यक्त केला. अवघ्या दोन आवठड्यात भारतीय उच्चायोगातील उपउच्चायुक्तांना समन्स जारी करण्याची पाकची ही पाचवी वळ आहे.
भारतीय जवानांनी सोमवारी केलेल्या गोळीबारात पाकचे तीन नागरिक ठार, तर अन्य चार जण जखमी झाले, असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google