Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भारतीय जवानांचा जोरदार पलटवार

भारतीय जवानांचा जोरदार पलटवार

=पाकिस्तानी कॅप्टनसह पाच सैनिक ठार=
वृत्तसंस्था
जम्मू, २३ नोव्हेंबर –
indian-army-soldiers-apपाकी सैनिकांच्या सीमेवरील माछिलच्या भ्याड हल्ल्यात मंगळवारी भारतीय लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आले होते. यातील एका जवानाच्या मृतदेहाची कू्ररपणे विटंबनाही करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या भारतीय जवानांनी आज सकाळपासूनच पाकवर जोरदार पलटवार केला आणि पाक लष्कराच्या कॅप्टनसह पाच सैनिकांना यमसदनी धाडले. पाकच्या गोळीबारात दोन भारतीय जवानही जखमी झाले.
मंगळवारच्या क्रूर कृत्यानंतर पाकी सैनिकांनी आज सकाळी नियंत्रण रेषेवरील सीमा सुरक्षा दलाच्या तळांवर बंदुका आणि तोफांमधून आग ओकली. जवानांनी क्षणही न घालवता या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. प्रतिहल्ला इतका जबरदस्त होता की, पाकच्या अनेक सुरक्षा छावण्याही यात उद्‌ध्वस्त झाल्या, अशी माहिती नॉर्दर्न कमांडचे ब्रिगेडियर जनरल पी. एस. गोत्रा यांनी दिली.
माछिल येथील घटनेचा आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारतीय लष्कराने दिला होता. पाकच्या गोळीबारानंतर बीएसएफ आणि लष्करी जवानांनी दोन आघाड्यांवरून पाकी सैनिकांवर हल्ला चढवला. पाकच्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
आमचे नागरिक ठार झाले : पाक
दरम्यान, भारतीय जवानांच्या हल्ल्यात पाक लष्कराच्या कॅप्टनसह पाच सैनिक ठार झाले असतानाही पाकने मात्र उलट कांगावा करीत भारताने आमच्या चार नागरिकांना ठार केल्याचा आरोप केला. अन्य सात नागरिक जखमी झाल्याचाही पाकचा दावा आहे.
तीन शहीद जवानांना श्रद्धांजली
माछिल येथील हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या तीन जवानांना लष्कराने आज बदामीबाग कन्टोनमेंट येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मनोजकुमार कुशवाड, प्रभू सिंह आणि शशांक कुमार सिंह अशी या शहीद जवानांची नावे असून, त्यांचे पार्थिव अंत्ययात्रेसाठी त्यांच्या स्वगृही रवाना करण्यात येणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google