Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारतीय सीमेजवळ पाकच्या लष्करी कवायती

भारतीय सीमेजवळ पाकच्या लष्करी कवायती

=दोन्ही शरीफांनी घेतला स्थितीचा आढावा=
वृत्तसंस्था
इस्लामाबाद, १६ नोव्हेंबर –
nawaz-sharif-rahil-sharifभारताला वारंवार युद्धासाठी चिथावणार्‍या आणि अणुहल्ल्याची धमकी देणार्‍या पाकिस्तानने भारताला लागून असलेल्या सीमावर्ती भागात लष्करी कवायती सुरू केल्या आहेत. पंतप्रधान नवाझ शरीफ आणि लष्करप्रमुख राहील शरीफ या दोघांनीही यावेळी सीमेवरील स्थितीची पाहणी केली.
भारतासोबत सातत्याने वाढत असलेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर कोणतेही आकस्मिक संकट उद्‌भवल्यास देशाचे लष्कर आणि हवाई दल किती सज्ज आहे, याबाबतचा आढावाही नवाझ शरीफ आणि राहील शरीफ यांनी घेतला.
पंजाब प्रांतातील बहवालपूर शहराला लागून असलेल्या भारतीय सीमेजवळ आज सकाळपासूनच या कवायती सुरू झाल्या आहेत. नवाझ शरीफ हे यावेळी मुख्य अतिथी होते, अशी माहिती लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
हेलिकॉप्टर गनशिप आणि लष्करी जवान या कवायतींमध्ये सहभागी होते. विशेष म्हणजे, गेल्या रविवारी पाकच्या सैनिकांनी नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी पाकच्या सात सैनिकांना यमसदनी धाडले होते. आमच्या संयमाला आमची कमजोरी समजण्याची चूक भारताने करू नये, असा इशारा शरीफ यांनी मंगळवारीच दिला होता.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google