Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारत तोफांचा मारा करतो

भारत तोफांचा मारा करतो

=पाकचे संयुक्त राष्ट्रात रडगाणे=
वृत्तसंस्था
न्यूयॉर्क, १८ नोव्हेंबर –
uno-united-nations-buildingभारतीय जवान जम्मू-काश्मिरातील सीमांवर सातत्याने तोफगोळ्यांचा मारा करीत आहे. यामुळे प्रादेशिक शांतता आणि सुरक्षा धोक्यात आली आहे, असे रडगाणे पाकिस्तान सरकारने संयुक्त राष्ट्रसंघात गायले.
संयुक्त राष्ट्रातील पाकच्या राजदूत मलीहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांना सीमेवरील स्थितीची माहिती देणारे पत्र लिहिले. भारतीय जवानांनी गेल्या आठवड्यात सीमेवरील पाकच्या सुरक्षा तळांवर तोफांचा भडीमार केला होता. यात आमचे सात सैनिक ठार झाले होते.
गेल्या १३ वर्षांच्या काळात भारताने प्रथमच तोफांचा वापर केला आहे. सीमेवरील तणाव वाढविण्याचा भारताचा हा प्रयत्नच आहे. प्रादेशिक शांतता व सुरक्षेला यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. काश्मीर खोर्‍यात भारतीय जवानांकडून मानवाधिकाराचे गंभीर उल्लंघन सुरू असून, त्यापासून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारे तोफांचा मारा केला जात आहे. भारताकडून सातत्याने संघर्षविरामाचे उल्लंघन सुरू असून, जागतिक शांततेसाठी वचनबद्ध असलेल्या संयुक्त राष्ट्राने याची गंभीर दखल घ्यायला हवी, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
भारताचा निषेध करणारा ठराव मंजूर
दरम्यान, पाकचे सात सैनिक ठार करणार्‍या भारताच्या गोळीबाराचा निषेध करणारा टराव आज पाकिस्तानच्या संसदेत मंजूर करण्यात आला. पाकिस्तानी रेडिओने याबाबतचे वृत्त दिले आहे. हे सभागृह भारताकडून सातत्याने सुरू असलेल्या गोळीबाराची गंभीर दखल घेते आणि निषेध करते, असे या ठरावात म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 19 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google