Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भारत २०० लढाऊ विमाने खरेदी करणार!

भारत २०० लढाऊ विमाने खरेदी करणार!

=‘मेक इन इंडिया’चा आग्रह=
fighter-plane-flankerनवी दिल्ली, [२९ ऑक्टोबर] – भारतीय हवाई दलाला आपल्या ताफ्यामध्ये सध्या २०० लढाऊ विमानांची गरज आहे. संरक्षण मंत्रालयाने विमान खरेदीसाठी काही कंपन्यांना पत्राद्वारे विचारणा केली आहे. या व्यवहारात भारताने ‘मेक इन इंडिया’ची भूमिका ठेवली आहे, असे हवाई दलाच्या सूत्रांनी आज शनिवारी येथे सांगितले. फ्रान्सच्या राफेलसोबत ३६ विमानांच्या खरेदीचा करार भारताने नुकताच केला आहे, हे येथे उल्लेखनीय.
लढाऊ जेट विमाने देशातच तयार व्हावीत आणि उत्पादनामध्ये स्थानिक भागीदार असावा, असा भारताचा आग्रह आहे. २०० विमानांचा हा सौदा पुढे ३०० विमानांपर्यंत वाढू शकतो. १५ अब्ज डॉलर्सपर्यंत हा व्यवहार होईल, अशी शक्यता हवाई दल अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. हा आजवरच सर्वात मोठा विमानखरेदी व्यवहार राहण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मिशन’ असलेल्या ‘मेक इन इंडिया’बाबत हवाई दल आग्रही आहे. लढाऊ विमानांची निर्मिती भारतातच व्हावी आणि आयातीला आळा बसावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. भारतीय हवाईदलाला सध्या विमानांची तातडीची गरज आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील तणावाची पार्श्‍वभूमी यासाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.
दोन कंपन्यांना सर्वाधिक स्वारस्य
जगभरातल्या अनेक कंपन्या आपली विमाने भारतास विकण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र दोन कंपन्यांनी सर्वाधिक स्वारस्य दर्शविले आहे. अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टीनने भारतात एफ-१६ विमान निर्मिती प्रकल्प उभारण्यात स्वारस्य दर्शविले आहे. लढाऊ विमानांच्या उत्पादनात लॉकहीड मार्टीन ही कंपनी आघाडीवर आहे. या क्षेत्रातील त्यांची स्पर्धक कंपनी स्वीडनची ‘साब’नेही भारतात ‘ग्रिपेन’ विमान निर्मिती करण्यात रस दर्शविला आहे. मात्र, तंत्रज्ञान हस्तांतरण कसे असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google