Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » मंत्री तेज नारायण पांडे सपातून निलंबित

मंत्री तेज नारायण पांडे सपातून निलंबित

♦शिवपाल यादव यांचा अखिलेशना धक्का
♦यादवी संपण्याची चिन्हे मावळली
shivpal-akhileshलखनौ, [२६ ऑक्टोबर] – मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील यादवीने आता आणखी उग्र रूप धारण केले आहे. नेताजींनी गळाभेट घडवून आणल्यानंतरही समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेश मंत्रिमंडळातील मंत्री तेज नारायण पांडे उर्फ पवन पांडे यांना आज बुधवारी पक्षातून निलंबित करण्यात आले.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या अतिशय विश्‍वासातले असलेले पवन पांडे यांना पक्षातून निलंबितकरण्यात आल्यानंतर काही वेळातच अखिलेश यांनी थेट राजभवन गाठले आणि राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली. तथापि, त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. राजभवनात सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीचीही माहिती दिली. मंत्रिमंडळात चार जागा रिक्त असल्याच्या पृष्ठभूमीवर ही बैठक असू शकते, असे सूत्रांचे मत आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत पांडे यांनी सपाचे आमदार आशू मलिक यांच्या कानशिलात हाणली होती. मलिक हे शिवपाल यादव यांचे विश्‍वासू आहेत. या घटनेचा राग काढताना शिवपाल यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पांडे यांच्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती पत्रपरिषदेत देताना शिवपाल यादव म्हणाले की, बेशिस्तपणाच्या आरोपाखाली पवन पांडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आता सरकारमधूनही बडतर्फ करण्यात यावे, अशी विनंती करणारे पत्र मी अखिलेश यादव यांना लिहिले आहे.
पक्षात अशा प्रकारच्या बेशिस्तीच्या घटना  कदापि खपवून घेण्यात येणार नाही. समाजवादी पार्टीत फूट पडली नसून, पक्ष आणि कुटुंब एक आहे. आमच्या कुटुंबात आणि पक्षात फूट पडली असल्याच्या अफवा उठविण्यात येत असून, त्यात काहीच तथ्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवपाल यांनी रिकामा केला सरकारी बंगला
दरम्यान, या सर्व घडामोडी सुरू असतानाच मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात आलेले शिवपाल यादव यांनी आज शासकीय बंगला रिकामा करून, त्यावरील आपल्या नावाची पाटी देखील काढली. निवडणुका काही महिन्यांवरच असल्याने आता पुन्हा मंत्रिपद स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Oct 27 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google