Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » मनोज तिवारी दिल्ली प्रदेश भाजपाचे नवे अध्यक्ष

मनोज तिवारी दिल्ली प्रदेश भाजपाचे नवे अध्यक्ष

=बिहारमध्येही बदल=
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर –
manoj-tiwari-bjpदिल्ली प्रदेश भाजपाच्या अध्यक्षपदी आज प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि गायक तसेच  खासदार मनोज तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली.  बिहार प्रदेश भाजपाच्या अध्यक्षपदी नित्यानंद राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज सतीश उपाध्याय यांच्या जागेवर दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष म्हणून मनोज तिवारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पुढील वर्षी दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने हा बदल केल्याचे मानले जात आहे. सतीश उपाध्याय यांच्या कार्यकाळात झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला होता.
दिल्ली प्रदेश भाजपात चैतन्य निर्माण करण्यासाठी मनोज तिवारी यांची अध्यक्ष म्हणून निवड केली जाईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. ती आज प्रत्यक्षात आली. मनोज तिवारी पूर्वांचलचे आहेत आणि दिल्लीत पूर्वांचलच्या लोकांची संख्या ४० टक्के आहे. पूर्वांचलच्या या मतदारांवर डोळा ठेवत भाजपाने मनोज निवारी यांच्या गळ्‌यात अध्यक्षपदाची माळ टाकली आहे. दिल्ली प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अजय माकन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टक्कर देऊ शकेल, असा नेता भाजपाला दिल्लीत हवा होता, मनोज तिवारी यांच्या रूपाने भाजपाला असा नेता मिळाला आहे.
नित्यानंद राय
अमित शाह यांनी उजियारपूरचे खासदार नित्यानंद राय यांची मंगल पांडे यांच्या जागेवर बिहार प्रदेश भाजपाचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. मंगल पांडे यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता, हे विशेष.

शेअर करा

Posted by on Nov 30 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google