Home » ठळक बातम्या, सोलापूर » मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण द्या : अजित पवार

मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण द्या : अजित पवार

=अक्कलकोट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा=
ajit-pawarअक्कलकोट, [२१ ऑक्टोबर] – कांदा, मिरची, टमाटे, झेंडू, शेतीमालास भाव नाही. शेतकर्‍यांची वाईट अवस्था आहे. शेती पिकाच्या आधारभूत किंमती जर वर्षी वाढ होणे आवश्यक आहे. मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला इतर समाजाचा आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या. फडणवीस सरकार असंवेदनशील आहे, असा घणघणाती हल्ला माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राज्य सरकार विरोधात अक्कलकोट येथील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केला.
राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या वतीने येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार बोलत होते. मेळाव्याचा अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दिवकआबा साळुंखे होते. माजी मंत्री दिलीप सोपल, पक्ष निरीक्षक प्रदिप गापूरकर, जिल्हा परिक्षद अध्यक्षा जयमाला गायकवाड, शिक्षण मंडळ सभापती मकरंद निंबाळकर माजी आमदार महादेव पाटील, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, प्रविण डोंगरे अप्पासाहेब कोरे, दिलीप सिध्दे, शशीकांत बिराजदार, मल्लीनाथ पाटील, मोहोळ नगराध्यक्ष रमेश बारसकर, यशोदा ढवळे, ता.अध्यक्ष रजीव क्षीरसागर, सुरेखा पाटील, अभिजित ढोबळे, अजिक्यराणा पाटील, शिवाजी राजेगावकर, फारुक शाब्दि, शिवशरण केसर आदी मान्यवरंाचा व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी कार्यकर्त्यांना नपा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. वेळ अंत्यत कमी आहे. रात्रदिवस कार्यकर्त्यांनी लोकांची कामे करावीत. चांगल्या लोकाची पक्षासाठी मदत घ्या. चर्चा करा. जि. प. प. स.साठी नपा निवडणुकासाठी चांगल्या उमेद्वाराबाबतच विचार केला जाईल. गट तर नको केवळ राष्ट्रवादी. पक्षाला प्राधान्य द्या असे पवार यांनी कार्यकर्तांना उद्देशून पक्षवादीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
जि.अध्यक्ष दिपक आबा साळुंखे, माजी मंत्री दिलीप सोपल, मल्लीनाथ पाटील, दिलीप सिध्दे, सुरेखा पाटील, माणिक बीराजदार यांनी आपले विचार व्यक्त केले. अक्कलकोट येथे प्रथमय माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे आगमन झाल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यंाचे जय्यत स्वागत केले. मेळाव्यास शिवराज स्वामी, शंकर व्हनमाने, मल्लीनाथ करवे, शिवानंद चौलगी, प्रदिप जगताप, संजय जगताप, शितल फुटाणे, रविराज गायकवाड, सुनिल सिध्दे, अविराज सिध्दे, रसुल पठाण, धोंड्या पारशेट्टी, मल्लीकार्जून बिराजदार, गंगाधर वळदड्डे, महादेव बिराजदार आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. वागदरीचे रत्नप्पा बंगरगी, राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षात प्रवेश केला. यावेळी फारुक शाब्दि राष्टवादीच्या वाटेवर असल्याचे सुतोवाच्य जि.अध्यक्ष साळुंखे पाटील यंानी केले.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under ठळक बातम्या, सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google