Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » मल्ल्यांची १७०० कोटींची संपत्ती जप्त होणार

मल्ल्यांची १७०० कोटींची संपत्ती जप्त होणार

=विशेष कोर्टाची ईडीला परवानगी=
vijay-mallyaमुंबई, [११ नोव्हेंबर] – बँकांचे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनच्या आश्रयात गेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांची आणखी १७०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याच्या दिशेने अंमलबजावणी महासंचालनालयाने (ईडी) पावले उचलली आहेत. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने ईडीला तशी परवानगी दिली आहे.
विशेष न्यायाधीश पी. आर. भावे यांनी गुरुवारी विजय मल्ल्यांना फरार आरोपी घोषित करताना त्यांची संपत्ती जप्त करण्याबाबतचा आदेश जारी केला असून, त्याची प्रत प्राप्त होताच ईडी मल्ल्यांची १७०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू करणार आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
ईडीने न्यायालयात मल्ल्यांच्या चल संपत्तीविषयी जे विवरण सादर केले, ती संपत्ती तत्काळ ताब्यात घेण्यात यावी, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या संपत्तीत मल्ल्यांच्या शेअर्सचाही संबंध आहे. तथापि, मल्ल्यांची विदेशातील संपत्ती जप्त करण्याची ईडीची विनंती न्यायालयाने अमान्य केली आहे. ईडीने यापूर्वी मल्ल्यांची ८०४१ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google