Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » मल्ल्यांच्या लक्झरी जेटचा आज लिलाव!

मल्ल्यांच्या लक्झरी जेटचा आज लिलाव!

=५३५ कोटींच्या वसुलीवर आयकर खात्याची नजर=
वृत्तसंस्था
मुंबई, २७ नोव्हेंबर –
vijay-mallyaबँकांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये स्थायिक झालेले मद्यसम्राट विजय मल्ल्यांकडून ५३५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी आयकर खात्याने मल्ल्यांच्या आलिशान लक्झरी जेटचा पुन्हा एकदा लिलाव करण्याचे ठरवले आहे. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस लिलावाची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
विमानाची राखीव किंमत कमी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आम्ही या जेट विमानाचे नव्याने मूल्यमापन करण्याकरिता व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेतली आहे, अशी माहिती आयकर खात्यातील सूत्रांनी दिली. आयकर खात्याने यापूर्वी मल्ल्यांच्या जेट विमानाची विक्री करण्यासाठी दोन ई-लिलावांचे आयोजन केले होते. पण, या दोन्ही लिलावांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
आयकर खात्याने सुरुवातीला या विमानाची राखीव किंमत १५२ कोटी रुपये ठेवली होती. पण, या किमतीत खरेदी करणारा एकही खरेदीदार पुढे आला नाही. यानंतर न्यायालयाने किमतीवर फेरविचार करण्याचे निर्देश दिले होते. तथापि, आता या विमानाची राखीव किंमत किती ठेवण्यात आली आहे, हे जाहीर करण्यास सूत्रांनी नकार दिला. किंमत जाहीर झाल्यास लिलावावर त्याचा विपरित परिणाम होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google