Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » मल्ल्यांविरुद्ध नव्याने अटक वॉरंट जारी

मल्ल्यांविरुद्ध नव्याने अटक वॉरंट जारी

=धनादेशाचा अनादर=
vijay-mallyaनवी दिल्ली, [४ नोव्हेंबर] – २०१२ मधील धनादेशाचा अनादर प्रकरणी आरोपी असलेला किंगफिशर इअरलाईन्सचा सर्वेसर्वा आणि मद्यसम्राट विजय मल्ल्यांविरुद्ध स्थानिक न्यायालयाने आज शुक्रवारी नव्याने अटक वॉरंट जारी केला. एकाच दिवशी त्यांच्याविरुद्ध बजावण्यात आलेला हा दुसरा वॉरंट आहे.
दिल्लीतील महानगर दंडाधिकारी सुमीत आनंद यांनी अटक वॉरंट जारी करताना, सध्या लंडनमध्ये आश्रयात असलेल्या मल्ल्यांना हा आदेश परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून पाठविण्यात यावा, असे स्पष्ट केले. यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील वर्षी ४ फेबु्रवारी रोजी करण्याचे ठरविले.
न्यायालयाने आतापर्यंत मल्ल्यांविरुद्ध विदेशी विनिमय नियमन कायद्यांतर्गत समन्स बजावले आहेत. पण, मल्ल्यांनी ते न स्वीकारल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आला.
मल्ल्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेला तुच्छ लेखले आहे. त्यांचा भारतात परतण्याचा कोणताही मानस दिसत नाही. भारतात परतणार असल्याचा मल्ल्यांचा दावा आणि पारपत्र रद्द करण्यात आल्याचे दिले जाणारे कारण हे न्यायालयीन प्रक्रियेचा अपमान करणारे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्यांना चार कोटी अमेरिकन डॉलर्सची संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ब्रिटिश कंपनी डियाजिओकडून मल्ल्यांना ही रक्कम देण्यात आली होती. मात्र त्यांनी याबद्दल आणि आपल्या इतर संपत्तीबद्दल कोणतीही माहिती न्यायालयाला दिली नाही. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google