Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » मसूदविरुद्ध कारवाईला विलंब का?

मसूदविरुद्ध कारवाईला विलंब का?

=भारताचा युनोला संतप्त सवाल=
syed-akbaruddinसंयुक्त राष्ट्रसंघ, [८ नोव्हेंबर] – पंजाबच्या पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर व त्याच्या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांच्या यादीत टाकण्यासाठी आणखी किती विलंब होणार आहे, असा संतप्त सवाल भारताने संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित केला.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद स्वत:च्याच नियमात आणि राजकारणात अडकली आहे. पाकिस्तानच्या भूमीत अनेक दहशतवादी गट आणि नेते मोकळे आहेत आणि ते भारतविरोधी कारवाया करीत आहेत. पण, त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी सुरक्षा परिषद असमर्थ ठरली आहे, अशी टीका भारताचे येथील स्थायी राजदूत सय्यद अकबरुद्दिन यांनी केली.
भारतासह काही प्रांतांमध्ये दहशतवादी दररोज हल्ले करून आपल्या सामूहिक विवेक बुद्धीवर आघात करीत आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही गट किंवा व्यक्तींवर आंतरराष्ट्रीय निर्बंध घालण्याबाबत विचार करण्यासाठी सुरक्षा परिषदेने स्वत:च नऊ महिन्यांचा कालावधी निर्धारित केला आहे, असे अकबरुद्दिन यांनी सुरक्षा परिषदेचा विस्तार आणि योग्य प्रतिनिधित्व यावरील परिसंवादात बोलताना सांगितले.
सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची गरज निर्माण झाली असताना, त्यावरही विचार करण्यासाठी हे सर्वोच्च जागतिक मंडळ प्रचंड विलंब करीत आहे. विद्यमान जागतिक स्थितीसाठी ही बाब नक्कीच चिंताजनक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google