Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महामार्गावरील टोल २ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार

महामार्गावरील टोल २ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर –
toll-nakaनोटबंदीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसूल करण्याचे काम थांबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. मात्र, आता २ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आज याबाबतची माहिती दिली.
देशातील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी आणि सुट्या नोटा नसल्यामुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून केंद्राने २४ नोव्हेंबरपासून टोलमधून सूट दिली होती आणि त्याची मुदत २ डिसेंबरपर्यंत वाढविली होती. तसेच २ ते १५ डिसेंबरपर्यंत ५०० च्या जुन्या नोटा टोल नाक्यावर स्वीकारण्यात येतील, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारच्या योजनेप्रमाणे पुरेशा संख्येत स्वाईप मशिन टोल नाक्यांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी स्टेट बँकेसह अन्य बँकांचीही मदत घेण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना टोल भरणे सोयीचे होणार असून त्यामुळे वाहतूकही सुरळीतपणे होणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 30 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google