Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » माजी राज्यपाल एस. के. सिन्हा यांचे निधन

माजी राज्यपाल एस. के. सिन्हा यांचे निधन

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर
lt-gn-sk-sinha-governerजम्मू-काश्मीर आणि आसामचे माजी राज्यपाल लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांचे आज सकाळी पावणे अकरा वाजता येथील आर ऍण्ड आर हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, आयएफएस असलेले पुत्र वाय. के. सिन्हा व तीन मुली आहेत. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येईल.
लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून अतिशय प्रभावी कामगिरी बजावली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानी सैन्याने १९४७ मध्ये काश्मीरवर आक्रमण करताच भारतीय लष्कराच्या आघाडीच्या फळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सिन्हा यांनी कुशलतेने पार पाडली. सरकारने त्यांच्याजागी जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य यांनी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करताच सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
पंतप्रधानांना दु:ख
लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांचे अतुलनीय कार्य, समर्पण व देशासाठी केलेला त्याग कधीच विसरता येणार नाही, असे पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 18 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google