Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » माजी राज्यपाल राम नरेश यादव यांचे निधन

माजी राज्यपाल राम नरेश यादव यांचे निधन

वृत्तसंस्था
लखनौ, २२ नोव्हेंबर
ram-naresh-yadavमध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात नाव आलेले मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नरेश यादव यांचे आज मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
२०११ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत ते मध्यप्रदेशचे राज्यपाल होते. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला, अशी माहिती कॉंगे्रसच्या एका वरिष्ठ नेत्याने वृत्तसंस्थेला दिली.
मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळातील भरती घोटाळ्यात यादव यांचे नाव आले होते. तथापि, मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात दाखल एफआयआर रद्द ठरवला होता. यादव राज्यपाल असल्याने त्यांना कायद्याच्या चौकटीत पूर्णपणे सुट असल्याचे कारण न्यायालयाने नमूद केले होते. यादव यांचे पुत्र शैलेश यांचेही नाव या घोटाळ्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.
पंतप्रधानांना दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री अखिलेश यादव, सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यादव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google