Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » मुख्यमंत्रिपदाबाबत तूर्तास निर्णय नाही : अमित शाह

मुख्यमंत्रिपदाबाबत तूर्तास निर्णय नाही : अमित शाह

=उत्तरप्रदेश निवडणूक=
amit-shahलखनौ, [१२ नोव्हेंबर] – उत्तरप्रदेश विधानसभेसाठी पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याबाबत भाजपाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज येथे दिली.
राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, गोवा आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यांतील निवडणुकांमध्येही भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. उत्तरप्रदेशबाबतही आम्ही असा कोणताही निर्णय घेतला नाही, असे अमित शाह यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह किंवा भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ या पदाचे दावेदार आहेत काय, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता. ते म्हणाले की, एखाद्या विशिष्ट कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीला नेता म्हणून समोर करण्याची संस्कृती भाजपात नाही. माझ्या पक्षात प्रत्येकालाच कठोर परिश्रम करावे लागतात. भरपूर घाम गाळावा लागतो. त्यानंतर योग्यतेनुसार ती व्यक्ती समार जात असते.
उत्तरप्रदेश विकासापासून अजूनही बराच दूर आहे. या राज्यात विकासाला बराच वाव आहे. या राज्याच्या विकासावरच देशाचा विकास अवलंबून आहे. भाजपा केवळ कामगिरीवर विश्‍वास ठेवते. कोणत्याही एका समाजाला खुश करण्याचे राजकारण भाजपाने कधीच केले नाही, असे सांगताना उत्तरप्रदेशातील पायाभूत सुविधांचा विकास, युवकांना रोजगाराच्या संधी आणि कायदा व सुव्यवस्थेची घडी या तीन क्षेत्रांना भाजपाने प्राधान्य दिले असल्याचे अमित शाह म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google