Home » उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » मुस्लिम महिलांचे जीवन उद्‌ध्वस्त होऊ देणार नाही!

मुस्लिम महिलांचे जीवन उद्‌ध्वस्त होऊ देणार नाही!

♦तिहेरी तलाकवर पंतप्रधानांची ठोस भूमिका
♦तोंडी तलाक देणार्‍यांची जागा तुरुंगात

महोबा (उत्तरप्रदेश), [२४ ऑक्टोबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज सोमवारी तिहेरी तलाकवर प्रथमच आपले मत व्यक्त केले. या प्रथेला माझा विरोध असून, यात मुस्लिम महिलांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होऊ देणार नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. हिंदू समाजातील स्त्रीभ्रूण हत्येच्या मानसिकतेवरही त्यांनी सडकून टीका केली.
स्त्रीभ्रूण हत्या हे फार मोठे पाप आहे. हे पाप करणारा हिंदू आहे म्हणून काय झाले? ही मानसिकता थांबविण्यासाठी माझ्या सरकारने अनेक पावले उचलली आहेत. मुली, माता आणि भगिणींचे रक्षण व्हायलाच हवे. यात धर्माचा विचार व्हायलाच नको, असे पंतप्रधानांनी बुंदेलखंड प्रांतातील महोबा येथे विशाल महापरिवर्तन रॅलीला संबोधित करताना सांगितले.
सध्या तिहेरी तलाकाचा मुद्दा चर्चेत आहे. ज्याप्रमाणे स्त्रीभ्रूण हत्या करणार्‍या हिंदूला कारागृहात जावे लागते, त्याचप्रमाणे केवळ फोनवरून तीन वेळा तलाकचा उच्चार करून माझ्या भगिनींचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणार्‍यांनाही हीच शिक्षा भोगावी लागणार आहे. कारण, हा देखील गंभीर गुन्हाच आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
उत्तर प्रदेशचा उत्तम प्रदेश
आधी बसपा आणि आता सपाच्या सत्ताकाळात उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांवर मोठा अन्याय झाला आहे. बुंदेलखंडाच्या भूमीत मुबलक पाणी उपलब्ध झाले, तर येथील शेतकरी आपल्या शेतीत सोने उगवू शकतो. उत्तर प्रदेशचे उत्तम प्रदेशात रूपांतर करायचे आहे. त्यामुळे तुम्ही आता सपा व बसपाच्या मानसिकतेतून बाहेर पडा. या दोन्ही पक्षांची आजवरची प्रथा लुटण्याचीच राहिली आहे. हे दोघेही एकमेकांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालत असतात, असेही पंतप्रधान म्हणाले.

शेअर करा

Posted by on Oct 25 2016. Filed under उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google