Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » मोदींच्या निर्णयाने डी-कंपनीची आर्थिक कोंडी

मोदींच्या निर्णयाने डी-कंपनीची आर्थिक कोंडी

=आता कोणी खंडणीही देईना=
वृत्तसंस्था
मुंबई, [१३ नोव्हेंबर] –
dawood-ibrahimगेल्या अनेक दशकांपासून नकली भारतीय चलनाच्या बळावर व्यवसाय करीत आलेल्या दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीची ५०० व एक हजारांच्या नोटा हद्दपार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आर्थिक कोंडी झाली आहे. मादक द्रव्यांची तस्करी आणि नकली नोटा तयार करणे यासारखे दाऊदचे उद्योग तर बंद झालेच, शिवाय या टोळीला आता खंडणी मिळणेही बंद झाले आहे.
एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून दाऊद व त्याच्या टोळीने जमा केलेली काळी माया एका रात्रीत रद्दी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बुधवारी रात्री देशाला संबोधित करताना अतिरेक्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासह काळा पैसा जमा करणार्‍यांना रस्त्यावर आणण्यासाठी हा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे दाऊद आणि त्याच्या मदतीवर चालणार्‍या दहशतवादी संघटनांचेही कंबरडे मोडले आहे.
दाऊदने आपल्या हस्तकांच्या माध्यमातून भारतातील बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतवला आहे. या व्यवसायालाही मोठा धक्का बसला आहे. त्याच्याजवळ असलेल्या अब्जो रुपयांच्या बनावट नोटा आता रद्दी झाल्या आहेत. याशिवाय, अवैध शस्त्रतस्करीतही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
इतकेच नव्हे, तर भारतीय नोटांचे नकली चलन तयार करून, ते भारतातील अतिरेक्यांपर्यंत पोहोचविण्याचे पाकमधील म्होरक्यांचे मनसुबेही यामुळे उधळले गेले आहेत. या दहशतवादी संघटनांना दाऊदमार्फत बनावट नोटांचा पुरवठा केला जात होता. आता या नोटाच चलनातून बाद झाल्याने दहशतवादी संघटनांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. पाकमधील अतिरेकी गटांनी पैशासाठी आता दाऊद व अन्य अंडरवर्ल्ड टोळ्यांवर दबाव आणायला सुरुवात केली असल्याने दाऊद आणि दहशतवादी संघटना यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 14 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google