Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय, सांस्कृतिक » मोदींच्या निर्णयावर कॉंग्रेसमध्ये परस्परविरोधी मतप्रवाह

मोदींच्या निर्णयावर कॉंग्रेसमध्ये परस्परविरोधी मतप्रवाह

=राहुल गांधींचा विरोध तर चिदंबरम यांची सावध प्रतिक्रिया=
rahul-gandhi-p-chidambaramतभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] – ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर कॉंग्रेसमध्ये परस्परविरोधी मतप्रवाह उमटले आहेत. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या निर्णयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असतांना ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम तसेच जनार्दन द्विवेदी यांनी सावधगिरीचा भूमिका घेतली आहे.
हा निर्णय घेतांना पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार केला नाही, असा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, काळा पैसा तर बांधकाम क्षेत्रात आणि विदेशात आहे. २ हजार रुपयांची नोट चलनात आणण्याच्या सरकारच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.
५०० आणि हजारची नोट चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका मध्यमवर्गाला, शेतकर्‍यांना, छोट्या दुकानदारांना आणि गृहिणींना बसेल, असे स्पष्ट करत राहुल गांधी म्हणाले की, एक हजार रुपयांची नोट रद्द करुन दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याच्या निर्णयामुळे काळ्या पैशाला कसा लगाम लागेल हे सरकारने स्पष्ट करुन सांगावे. मोठ्या प्रमाणातील काळा पैसा हा बांधकाम क्षेत्रात आणि विदेशात लोकांनी ठेवला आहे, तो देशात आणण्यासाठी सरकार काय करत आहे.
पी. चिदंबरम
काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी ५०० आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे सरकार म्हणत आहे, तसे असेल तर या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज एका पत्रपरिषदेत सांगितले.
कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत चिदंबरम म्हणाले की, या निर्णयामुळे काळ्या पैशाला लगाम घालता येईल याबाबत आमच्या मनात शंका आहे. सरकारच्या हेतूवर आम्हाला शंका घ्यायची नाही, मात्र सरकार यातून काळ्या पैशाला कशाप्रकारे लगाम घालू शकेल, यावर आमचे लक्ष राहणार आहे.
५०० आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची घोषणा सरकारने केली आहे, मात्र जनतेला कोणताही त्रास न होता, त्यांची पिळवणूक न करता सरकारने या नोटा बदलून द्याव्या, अशी आमची मागणी आहे, असे स्पष्ट करत चिदंबरम म्हणाले की, १९७८ मध्येही जनता पक्षाच्या राजवटीत मोठ्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र तो निर्णय फसला आणि काही दिवसातच सरकारला पुन्हा मोठ्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घ्यावा लागला. आतापर्यंत अनेक सरकारांनी असा निर्णय घेण्याचा विचार केला,पण या निर्णयामुळे होणारा फायदा कमी आणि नुकसान जास्त आहे, असे लक्षात आल्यावर असा निर्णय घेतला आही.
सरकार एकीकडे ५०० आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा करते, आणि दुसरीकडे २ हजारची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेते, हे मला समजले नाही. आजच्या काळात ५०० रुपयाची नोट ही मोठ्या रकमेची नोट नाही, असे ते म्हणाले.
कॉंग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनीही या निर्णयामुळे काळ्या पैशाला लगाम बसली आहे, असे आमच्या लक्षात येईल, तेव्हा या निर्णयाचे आम्ही स्वागत करु असे म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google