Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मोदींच्या नेतृत्वावर देशवासीयांचा विश्‍वास

मोदींच्या नेतृत्वावर देशवासीयांचा विश्‍वास

=मीनाक्षी लेखी यांचे प्रतिपादन=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर –
meenakshi-lekhi-1विदेशातील बँकांमध्ये असलेल्या काळ्या पैशावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे कॉंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्यावर भाजपाने आज जोरदार पलटवार केला. सिब्बल यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. काळ्या पैशाच्या मुद्यावर नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत जी काही पावले उचलली, ती देशवासीयांना मान्य असून, जनतेचा नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्‍वास आहे, असे भाजपा नेत्या मीनाक्षी लेखी यांनी स्पष्ट केले.
सिब्बल यांच्यावर किती विश्‍वास ठेवायचा, हे देशवासीयांना चांगले कळते. विरोधकांनी सरकारवर विश्‍वास ठेवला, तर काहीतरी चुकीचे घडत आहे, असा त्याचा अर्थ होतो, असे मीनाक्षी लेखी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
सिब्बल यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदींवर टीका करताना, मोदी यांनी ८० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्‍वासन दिले होते, पण त्यांनी ते पूर्ण केले नाही. दोन वर्षे लोटली, मात्र लोकपाल अद्यापही कपाटातच पडून आहे. आपण अशा पंतप्रधानावर विश्‍वास ठेवू शकत नाही. भाषण आणि रिकाम्या आश्‍वासनांवर सरकार चालत नाही, असे सिब्बल म्हणाले होते.

शेअर करा

Posted by on Nov 26 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google