Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » युपीएससी परीक्षार्थींना ‘ई-ऍडमिट कार्ड’

युपीएससी परीक्षार्थींना ‘ई-ऍडमिट कार्ड’

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, [१३ नोव्हेंबर] –
upsc1लोक सेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या नागरी सेवा परीक्षांसाठी पारंपरिक प्रवेशपत्रांऐवजी ‘ई-ऍडमिट कार्ड’ जारी करण्यात येणार आहे. परीक्षार्थींना हे ‘ई-ऍडमिट कार्ड’ www.upsc.gov.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करावे लागेल.
वेबसाईटवरून हे ई ऍडमिट कार्ड डाऊनलोड केल्यावर त्याचे प्रिंट आऊट परीक्षार्थींना सोबत बाळगायचे आहे, असे युपीएससीने म्हटले आहे.
नागरी सेवांबाबत युपीएससीतर्फे ३ ते ९ डिसेंबर या कालावधीत देशभरात २३ केंद्रांवर परीक्षा होणार आहेत. ई ऍडमिट कार्डवर परीक्षार्थींचे छायाचित्र नसेल वा ते अस्पष्ट असेल तर संबंधित परीक्षार्थीला ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट यापैकी विशिष्ट ओळखपत्राचा आधार घ्यावा लागेल, असे युपीएससीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
केंद्रीय लोक सेवा आयोगातर्फे दरवर्षी तीन टप्प्यात नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. प्रारंभिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे हे तीन टप्पे आहेत. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) यासाठी प्रामुख्याने युपीएससीतर्फे उमेदवारांची निवड केली जाते.

शेअर करा

Posted by on Nov 14 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google