Home » ठळक बातम्या, फिचर » येथे घेतला होता हनुमंताने जन्म…

येथे घेतला होता हनुमंताने जन्म…

गुमला (झारखंड), २४ नोव्हेंबर –
najandham-hanumanji-birth-placeरामभक्त हनुमानाच्या अनेक कथा आपल्याला माहिती असतात. जन्मल्याबरोबर बालहनुमान सूर्याला गिळण्यासाठी आकाशात झेपावल्याची कथाही आपण ऐकलेली असते. मात्र, या हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला असावा या संदर्भात खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आंजनधाम हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा केला जातो व त्याचा पुरावा देणार्‍या अनेक जागा आजही येथे पाहायला मिळतात. दुसऱ्या एका मतप्रणाली, व संशोधना प्रमाणे अनेगुंडी येथील अंजनेय डोंगरावर हनुमंताचा जन्म झाल्याचे मानले जाते.
आंजनधामपासून जवळच पालकोट खडकात सुग्रीव गुहा असून तेथेच किष्कींधाही आहे, अशी माहिती आहे. या संदर्भात असे सांगितले जाते की, हनुमंताची माता अंजनी रोज एका नव्या तलावात स्नान करून या तलावांच्या जवळ असलेल्या शिवलिंगाची पूजा व जलाभिषेक करीत असे. या ठिकाणी जवळपास ३६० तलाव व ३६० शिवलिंगेही आहेत. तिच्या नावावरूनच या ठिकाणाचे नाव आंजनेय किंवा अंजनधाम असे पडल्याचेही सांगितले जाते. अनेक ऋषी शांती मिळविण्यासाठी येथे तपासाठी येत असत व येथे महादेवाच्या पूजनाची प्राचीन परंपराही आहे.
या ठिकाणी आता अंजनी मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या खालीच सर्पगुहा आहे. भाविक या गुहेचे दर्शन आवर्जून घेतात. ही गुहा १५०० फूट लांबीची असून या गुहेतूनच माता अंजनी नदीवर जाऊन स्नान करत असे, असा भाविकांचा विश्‍वास आहे. मंदिरात अंजनी व बालहनुमानाची मूर्ती पाहायला मिळते.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under ठळक बातम्या, फिचर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google