Home » कर्नाटक, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » येदीयुरप्पा यांची निर्दोष मुक्तता

येदीयुरप्पा यांची निर्दोष मुक्तता

=बेकायदेशीर खाण उत्खनन=
B S Yeddyurappa outside CBI courtबंगळुरू, [२६ ऑक्टोबर] – बेकायदेशीर खाण उत्खननाशी संबंधित सुमारे ४० कोटी रुपयांच्या दलालीप्रकरणात आरोप असलेले कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येदीयुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्यांची विशेष सीबीआय न्यायालयाने आज बुधवारी निर्दोष मुक्तता केली.
न्यायालय आज नेमका काय निकाल जाहीर करणार, हे ऐकण्यासाठी न्यायालयीन कक्षात आणि परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती. आपला निकाल वाचून दाखविताना न्या. आर. बी. धर्मागौडेर यांनी या प्रकरणातून अन्य नऊ जणांनाही मुक्त केले. २०११ मध्ये कर्नाटकचे तत्कालीन लोकायुक्त संतोष हेगडे यांनी येदीयुरप्पा यांच्यावर ४० कोटी रुपये दलाली घेतल्याचा ठपका ठेवला होता. यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
सीबीआयने या प्रकरणी ऑक्टोबर २०१५ मध्ये येदीयुरप्पा, त्यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र व बी. वाय. विजयेंद्र तसेच जावई सोहन कुमार यांच्यासह अन्य काही व्यक्ती व कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल केला होता. याच प्रकरणात येदीयुरप्पा यांनी ऑक्टोबर २०११ मध्यश तीन आठवड्यांचा कारावासही भोगला आहे. यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

न्याय मिळाला : येदीयुरप्पा
उशिरा का होईना, अखेर मला न्याय मिळाला. देशातील न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास आहे आणि तो कधीच कमी होणार नाही. या प्रकरणात मी निर्दोष असतानाही खूप काही सहन केले. न्याय मिळाला, याचे समाधान आज मला अधिक आहे, अशी प्रतिक्रिया येदीयुरप्ता यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Posted by on Oct 27 2016. Filed under कर्नाटक, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google