Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने मदत करावी

रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने मदत करावी

=मुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी=
devendra-fadnavis7तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [५ नोव्हेंबर] – विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राजधानी दिल्लीत आले असता मुख्यमंत्र्यांनी या मागणीसाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांच्यासोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डने कमी व्याजदरात १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केली होती. नाबार्डकडून हे कर्ज लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे, अशी मागणी फडणवीस यांनी जेटली यांच्याकडे केली. यावर जेटली यांनी सकारात्मक कारवाईचे आश्‍वासन दिले.
वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी करतांना राज्याच्या होणार्‍या नुकसानीची भरपाई करतांना उदभवलेल्या परिस्थितीकडे फडणवीस यांनी जेटली यांचे लक्ष वेधले. या कराच्या आकारणीत पारदर्शिता आणण्यासह संबंधित अधिसूचनेतील दंडसंहिताविषयक तरतुदींची तीव्रता कमी करण्याची मागणीही फडणवीस यांनी केली.
पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी जागतिक वित्तीय संस्थांकडून राज्यांना मिळणार्‍या कर्जाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती फडणवीस यांनी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे केली. यावेळी आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव शक्तिकांत दास उपस्थित होते. उद्योग व्यवसाय सुधारणा कृती कार्यक्रमांचे मानाकंत निश्‍चित करतांना राज्याने सूचवलेल्या मुद्यांचा त्यात समावेश करावा, अशी मागणी फडणवीस यांनी नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांच्याकडे केली. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या उद्योग सुधारणा निर्देशांकात महाराष्ट्राला मागील वर्षीपेक्षा दुप्पट गुण मिळाले, मात्र महाराष्ट्राचे स्थान आठव्या क्रमांकावरून दहाव्या क्रमांकापर्यत घसरले. त्याबाबत यावेळी चर्चा झाली. कृषी पणन क्षेत्रातील कामगिरीत महाराष्ट्राने मिळवलेल्या पहिल्या क्रमांकाबद्दल पनगढिया यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google