Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » रत्नागिरी, सातार्‍याला भूकंपाचा सौम्य धक्का

रत्नागिरी, सातार्‍याला भूकंपाचा सौम्य धक्का

वृत्तसंस्था
मुंबई, २५ नोव्हेंबर –
satara_mapकोकणाच्या रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे सौम्य धक्के बसले. याशिवाय सातार्‍यालाही भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू अलोटी गावाजवळ होता आणि या दोन्ही धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी होती.
रत्नागिरी, चिपळूण, देवरुख, साखरपा यासारख्या परिसरात मध्यरात्रीनंतर भूकंपाचे दोन ते तीन धक्के बसले. देवरुखला मध्यरात्री १२.५० वाजता भूकंपाचा मध्यम स्वरुपाचा धक्का, तर कोयना, सातार्‍याला १२.३७ वाजता भूकंपाचा धक्का बसला. या दोन्ही भूकंपात कोणतीही हानी झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रत्नागिरीला मध्यरात्री १२.५८ वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. येथील भूकंपाची तीव्रताही ४.३ इतकी होती. सातारा परिसरातील अलोटी गावात जमिनीखाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google