Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रस्ते अपघातातील बळींची संख्या अर्ध्यावर आणणार : गडकरी

रस्ते अपघातातील बळींची संख्या अर्ध्यावर आणणार : गडकरी

nitin-gadkari1नवी दिल्ली, [२६ ऑक्टोबर] – २०१९ पर्यंत रस्ते अपघातातील बळींची संख्या अर्ध्यावर आण्याचा निर्धार व्यक्त करत मोटर वाहन (दुरुस्ती) विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पारित होईल, असा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
राजधानी दिल्लीत आयोजित रस्ते सुरक्षा विषयक कार्यशाळेत बोलतांना गडकरी म्हणाले की, दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागतात, तर तीन लाखावर लोक जायबंदी होतात. अपघातातील मृत आणि जखमींचा हा आकडा माझ्यासाठी चिंताजनक आहे. २०१९ पर्यंत हा आकडा  अर्ध्यावर आणण्याचा आमचा निर्धार आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत.
अपघातांच्या कारणाचा शोध घेऊन ते दूर करण्यासाठी अधिकार्‍यांनी कामाला लागले पाहिजे, असे आवाहन करत गडकरी म्हणाले की, रस्त्यांचे सदोष बांधकाम हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. कोणत्या रस्त्यावर आणि कुठे सर्वाधिक  अपघात होतात, हे अधिकार्‍यांनी शोधून ती कारणे दूर केली पाहिजे. मात्र अधिकारी या कामाबाबत गंभीर नाही, याबद्दल खंत व्यक्त करतांना कामचुकार अधिकार्‍यांना खडसावत गडकरी यांनी त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेतही दिले. आातपर्यत अपघातप्रवण ७८६ स्थळांचा शोध लावण्यात आला आहे, याठिकाणी दुरुस्तीसाठी ११ हजार कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. आवश्यकता पडली तर यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अभियंत्याचीही मदत घेतली जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
मोटरवाहन दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. या विधेयकातून वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर दंडाची आणि कठोर कारवाईची तरतूद आहे. अपघातात जखमी झालेल्यांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद या विधेयकात आहे. त्याचप्रमाणे अपघातात मृत्युमुखी पडणार्‍याला जास्तीत जास्त १० लाख रुपये भरपाई देणे विमा कंपनीला बंधनकारक करण्यात आले आहे.

शेअर करा

Posted by on Oct 27 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google