Home » क्रीडा, ठळक बातम्या » राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताला ३० पदके

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताला ३० पदके

commonwealth_games_federationसिंगापूर, [६ नोव्हेंबर] – येथे सुरू असलेल्या सीनियर राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांनी धमाल उडवून दिली व पहिल्याच दिवशी एकूण ३० पटकांची कमाई केली. त्यात १४ सुवर्णपदकांचा समावेश आहे.
भारतीय कुस्ती पथकाचे प्रमुख नरेन्द्रकुमार म्हणाले की, या ३० पदकांमध्ये महिला गटातील १५ पदकांचा समावेश आहे. ४८ मल्लांचे पथक स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
भारतीय महिला पथकातील रितू, पिंकी, ललिता सहरावत, मंजू सिहाग, रेशमा आणि पिंकी मलीक यांनी सुवर्णपदक पटकावले. प्रियंका, दिव्यांशी, सोनाली, सरिता, गार्मी, कविता, ज्योती लोहिया यांनी रौप्यपदक व मनीष, निक्की मलीक यांनी कांस्यपदक प्राप्त केले.
पुरुष गटातून ५७ किलो वजन गटात संदीप तोमर, याच गटात अमित धनखड, ९७ किलो वजन गटात सत्यव्रत यांनी सुवर्ण, विनोद ( ५७), आणि रूबलजित (९७ किलो) यांनी रौप्यपदक मिळविले.
ग्रीको रोमन प्रकारात मनीष, गुरप्रीत, हरप्रीत, प्रभातसिंह, नवीन, यांनी सुवर्ण, रवीन्द्रने रौप्य आणि दिनेश, रवीन्द्र खत्री, यशपाल महाबीर यांनी कांस्यपदक पटकावले.

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google